विधायक ! पतीचं यकृत, किडनी, हृदय पत्नीनं केलं दान

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – अवयव दान ही एक अतिशय चांगली संकल्पना आहे. मृत्यूनंतर अनेक जण आपल्या प्रियजनांचे अवयव दान करून अनेकांना जीवदान देत असतात. याचाच प्रत्यय पुण्यातील एका मेडिकल दुकानदाराच्या मृत्यूनंतर पुणेकरांना आला. ऐन तारुण्यात आपल्या पतीचे निधन झाल्यानंतर या महिलेने आपल्या पतीच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. पुण्यातील कोथरूडमध्ये राहणारे तुषार सुभाष कोतकर यांचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने हा निर्णय घेतला. तुषार सुभाष कोतकर यांनी पुण्यात अत्यंत कष्टाने तीन मेडिकल दुकाने उभी केली होती. इतरांना उपयोगी पडण्याच्या भावनेने या महिलेने पतीचे यकृत, किडनी, हृदय व अन्य अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. सीमा तुषार कोतकर असे या महिलेचे नाव असून त्यांनी हा कौतुकास्पद निर्णय घेतला.

११ जुलै रोजी तुषार यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तुषार हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील. मात्र पुणे शहरात त्यांनी आपले बस्तान बसवले आणि पुण्यात तीन मेडिकल दुकाने उघडली. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचारासाठी खूप प्रयत्न केले. मात्र अखेर ७२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर डॉक्टरांनी त्यांना ‘ब्रेन डेड’ घोषित केले. त्यानंतर त्यांच्या पत्नी सीमा आणि कुटुंबीयांनी त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी यकृत, किडनी, हृदय व अन्य अवयव दान करून समाजाला आदर्श घालून दिला.
दरम्यान, तुषार यांच्यावर आज पुण्यातच अंत्यसंस्कार होणार असून सीमा कोतकर यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 जिरे-आल्या चा रस प्या ! १० दिवसात पोट कमी करा

 कॅन्सर च्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत !

 सावधान ! साबण आणि टूथपेस्ट ने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

 डायनिंग टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवण करणे योग्य ; जाणून घ्या फायदे

 खुशखबर ! १००० हून अधिक ‘औषध -गोळ्या’ होणार स्वस्त

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या

Loading...
You might also like