संतापजनक ! रक्ताच्या थारोळ्यातील पतीला वाचवण्यासाठी पत्नीचा ‘आक्रोश’, पण ‘बघे’…

पटणा : वृत्तसंस्था – बऱ्याचदा अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करायची सोडून लोक त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. असाच एक लाजिरवाणा आणि संतापजनक प्रकार बिहारमधील सीवान स्टेशनवर घडला आहे. पत्नीसोबत प्रवास करणाऱ्या एका प्रवाशावर दिवसाढवळ्या पत्नीसमोर गोळी झाडण्यात आली. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीला वाचवण्यासाठी पत्नी उपस्थीतांकडे मदतीची याचना करत होती.

मात्र, दगडाचे काळीज असलेल्या लोकांना तिची थोडी देखील दया आली नाही. तिला मदत करण्याऐवजी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिच्या पतीचे व्हिडीओ बनवत होते. वेळीच उपचार न मिळाल्याने जखमी पतीने आपल्या पत्नीच्या मांडीवरच विव्हळत प्राण सोडले. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती कोलकत्ता येथील व्यापारी असल्याचे समोर आले आहे. रविवारी दुपारी मोहम्मद फैजल हे आपली नवविवाहित पत्नी अंजुम खातून हिच्यासह सिवास रेल्वे स्टेशनवर कोलकत्ता येथे जाणाऱ्या बाघा एक्सप्रेसची वाट पहात होते.

त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने मोहम्मद यांच्यावर पाठिमागून गोळी झाडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या फैजलला वाचवण्यासाठी त्याची पत्नी मदतीसाठी विनवण्या करत होती. मात्र, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांनी मदत करण्याऐवजी घटनेचा व्हिडीओ बनवत होते. एवढेच नाही तर एक पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी आला, त्याने चौकशी केली आणि निघून गेला. मात्र, त्यानेही फैजलला वाचवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. अखेर फैजलने आपल्या पत्नीच्या मांडीवर प्राण सोडले.

फैजल यांचा सहा महिन्यापूर्वी विवाह झाला होता. ते आपल्या पत्नीला नेण्यासाठी कोलकत्याहून सीवान येथे आले होते. दरम्यान, खूनाचे नेमके कारण समजू शकले नाही. तसेज ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्ही नसल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीसुद्धा देशात अशा बऱ्याचशा घटना घडल्या आहेत. जेथे जखमींना मदत करायची सोडून लोक त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यात धन्यता मानली आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like