पत्नीवर पतीने केला चाकू हल्ला

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – घरात अडकवलेल्या पिशवीतून पैसे घेण्यास सांगितले म्हणून पतीने पत्नीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना मोशी आदर्शनगर परिसरात घडली.

याप्रकरणी वीस वर्षीय पत्नीने फिर्याद दिली आहे. तर पती देवीदास गंगाराम गांगुर्डे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देविदास आणि फिर्यादी हे पती-पत्नी आहेत. सोमवारी सकाळी देविदास याला गावी जायचे असल्याने त्याने पत्नीकडे पैसे मागितले. पत्नी झोपेत असल्याने त्यांनी रॅकला अडकवलेल्या पिशवीतून पैसे घ्या, असे पतीला सांगितले.

याचा राग अल्याने पतीने घरातील चाकू घेऊन पत्नीवर धावून आला आणि हातावर तसेच मानेवर वार करून जखमी केले. तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.