पत्नी ‘गर्भवती’ झाल्यानंतर ‘इथं’ पती करतो दुसरं लग्न, कारण ‘असं’ की ‘पहिली’ आक्षेप घेऊ शकत नाही

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जर एखाद्या महिलेला दिवस गेले तर तिचा पती घरी थांबतो तिची काळजी घेतो. तिला क्षणभरही दूर जाऊ देत नाही. परंतु एक ठिकाण असं आहे जिथं महिला प्रेग्नंट झाल्यानंतर तिचा पती तिची चिंता सोडून दुसऱ्या पत्नीचा शोध सुरू करतो आणि दुसरं लग्नही करतो. होय हे खरं आहे. राजस्थानच्या बारमेरमधील देरासर गावात अनेक दशकांपासून ही प्रथा सुरू आहे. दु:खद बाब अशी की, महिलांना माहिती असतं की, लग्नानंतर एक ना एक दिवस तिची सवत येणार आहे.

या ठिकाणी अशी प्रथा आहे की, इथं एका मुलानं लग्न केल्यानंतर बाप होण्याआधीच त्याला दुसरं लग्न करावं लागतं. राजस्थानच्या बाडमेरमधील देरासर गावातून ही प्रथा सुरू झाली आहे. या गावात पाण्याची खूप कमतरता आहे. मुलींना लहानपणापसूनच पाणी आणण्याचं ट्रेनिंग दिलं जातं. त्यांना कैक मैल जाऊन उन्हाळा किवा थंडीत पाणी शोधून आणावं लागतं. मुलगी यात परफेक्ट आहे कि नाही यावरून तिचं लग्न केलं जातं. गर्भवती झाल्यानंतर या महिलांना पाणी आणणं शक्य होत नाही. त्यामुळेच पती दुसरं लग्न करतो. यानंतर पाणी आणण्याची जबाबदारी नवीन पत्नीवर येते. 2011 च्या जनगणनेनुसार, देरासर गावची लोकसंख्या 596 आहे. यात 309 पुरुष आणि 287 महिला आहेत.

महाराष्ट्रातही अशी 19000 गावं :
अनेक वर्षांपासून देरासर गावात बहुविवाहाची प्रथा सुरू आहे. महाराष्ट्रातही अशी काही गावं आहेत जिथं ही प्रथा सुरू झाली आहे. महिलांना पाणी आणण्यासाठी तब्बल 10 ते 12 तास लागतात. अनके गाव पार करत त्यांना पाणी आणायला जावं लागतं. महाराष्ट्रातही अशी 19000 गावं आहेत. दुसऱ्या किंवा पाणी आणणाऱ्या या पत्नीला वाटर वाईव्स (water wives)  किंवा वाटर बाईस (water Bais) म्हटलं जातं. दुसरी पत्नी जास्त करून नवऱ्यानं टाकलेली किंवा विधवा असते. जास्त करून पुरुष कमी वयाच्या महिलेशी लग्न करतात ज्या कधी कधी त्यांच्या अर्ध्या वयाच्या असतात. कारण त्या जास्त पाणी आणतात.

अधिकारीही काही करू शकत नाही :
अशा गावातील ही प्रथा अधिकारीही रोखू शकत नाहीत. हैराण करणारी बाब अशी की, इथं बहुविवाह हा पहिल्या किंवा दुसऱ्या पत्नीच्या मर्जीनं होतो. त्यामुळे अधिकारी काही करण्यास असमर्थ ठरतात.