पत्नीचा गळा आवळून खून करत पतीची आत्महत्या

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – पत्नीचा गळा आवळून खून करत पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दिग्रस तालुक्यातील कलगाव येथे मंगळवारी सकाळी उघडकिस आला.

दीपक किसन गवळी (३५), रंजना दीपक गवळी (३०) अशी दोघांची नावे आहेत.

दीपक हा मुळचा यवतमाळ तालुक्यातील मांगूळ येथील राहणारा आहे. दीपक आणि रंजना यांना ६ वर्षांचा मुलगा आणि ४ वर्षांची मुलगी आहे. तो कलगाव येथे सासऱ्याकडे रहायला गेला होता. सोमवारी रात्री त्याने पत्नीचा गळा आवळून खून करत स्वत: देखील गळफास घेतला. त्यानंतर मंगळवारी सकाळी हा प्रकार समोर आला आहे. मात्र याचे कारण अद्याप समजू शकले नाही.