धक्कादायक ! पत्नीसह 3 मुले आणि 2 मुलींवर केला प्राणघातक हल्ला, चौघांचा मृत्यू, प्रचंड खळबळ

पाटणा : पोलीसनामा ऑनलाइन – बिहारमधील सिवान येथे एका माथेफिरु पतीने केलेल्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माथेफिरुने आपली पत्नी, तीन मुले आणि दोन मुलींवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. त्यात तीन मुलांचा तर एका मुलीचा मृत्यू झाला आहे. तसेच पत्नी आणि एक मुलगी गंभीर जखमी असून त्यांच्यावर पाटणा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेनंतर आरोपीने विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

आरोपीने केलेल्या हल्ल्यात मुलगी ज्योतीकुमार, मुलगा अभिषेक कुमार, मुकेश कुमार आणि भोला कुमार हे ठार झाले आहे. एक मुलगी अंजली कुमार आणि पत्नी रिता देवी हे गंभीर जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवले.

आरोपीने सांगितल्यानुसार, आम्ही सर्वजण बाहेर जाऊन आलो. त्यावेळी अचानक माझ्या शरीरात काहीतरी प्रवेश केल्यासारखे झाले. प्रवेश केलेल्याने मला कुऱ्हाड घेण्यास सांगून कुटूंबातील सर्वांना ठार करण्यास सांगितले. मी कुऱ्हाड उचलली आणि सर्वांवर वार केले. कुटूंबावर हल्ला केल्यानंतर आपण सिवानच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस ठाण्यात दूरध्वनी संपर्क साधला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर गस्ती पथकाने घरी येऊन मला अटक केली. या हृदयद्रावक घटनेने आजुबजूच्या गावातही खळबळ उडाली आहे.

दरम्यान, एका दिवसापूर्वीच बिहारमधील नवादा जिल्ह्यात एका सेवानिवृत्त फौजदाराने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याचे समोर आले. तिघांचे मृत्यूदेह एका पलंगावर आढळून आले होते. तिघांनी आत्महत्या केल्याचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता.

You might also like