‘तो’ दुसरीशी फोनवर ‘गूलू-गूलू’ बोलत होता, पत्नीनं पाहिलं अन् पतीच्या गुप्‍तांगावर चाकूनं सपासप वार करून केला खून

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या उल्कानगरीतील एका उद्योजकाचा त्याच्या पत्नीने खून केल्याची धक्कादायक घटना घडली. पती दुसऱ्या महिलेसोबत बोलत असल्याचे पाहून संतापलेल्या पत्नीने त्याच्या जांघेत चाकू भोसकून खून केला. मात्र, हा प्रकार त्यांच्या मुलीने पाहिल्याने खरा प्रकार समोर आला. शैलेंद्र राजपूत असे खून झालेल्या उद्योजकाचे नाव आहे, तर पूजा राजपूत असे आरोपी पत्नीचे नाव आहे.

शैलेंद्र आणि पूजाचा प्रेमविवाह झाला असून त्याची वाळूज एमआयडीसीत कंपनी आहे. त्यांच्यामध्ये यापूर्वीच वाद सुरु झाले होते. वादातून पूजाने शैलेंद्रच्या अंगावर उकळते पाणी टाकले होते. घटनेच्या दिवशी शैलेंद्र घरी आला त्यावेळी त्यांच्या पुन्हा वाद झाले. याच वादातून तिने शैलेंद्रच्या जांघेत चाकू भोसकला. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान पूजाने पूरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

शैलेंद्र व पूजा यांच्यात वारंवार वाद होत होते. काही महिन्यांपूर्वीच दोघे मुलांसोबत खिंवसरा पार्कमधील एका फ्लॅटमध्ये रहायला आले होते. सोमवारी रात्री शैलेंद्र घरी आले. त्यानंतर एका आर्किटेक्ट महिलेशी ते फोनवर बोलत होते. याचाच पत्नी पूजाला राग आला. त्यातून दोघांत वादाला सुरुवात झाली. त्यानंतर खुनाचा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

Visit – policenama.com 

You might also like