पत्नीचे लग्नानंतर देखील प्रियकरासोबत ‘अनैतिक’ संबंध, त्याच्याच मदतीने काढला पतीचा ‘काटा’

तरनतारन (पंजाब) : वृत्तसंस्था – प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना पंजाबमध्ये घडली होती. या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. तिचा प्रियकर अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही खळबळजनक घटना पंजाब मधील तरनतारन जिल्ह्यातील पल्लासोर या गावात घडली. काही दिवसांपूर्वी पल्लासोर गावामध्ये पत्नीने आपल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केला होता. पतीचा खून केल्यानंतर पत्नी आणि तिचा प्रियकर फरार झाले होते. सिमरन कौर असे अटक करण्यात आलेल्या पत्नीचे नाव असून तिचा प्रियकर लवप्रीत फारार आह.

जेवणातून पतीला झोपेच्या गोळ्या देत होती
मृत व्यक्तीच्या लहान मुलीने सांगितले की, तिच्या आईचा प्रियकर त्याच गावातील असून ती त्याला रोज व्हिडिओ कॉल करत होती. तसेच तो घरी देखील येत होता. आई रात्रीच्या जेवणातून वडीलांना झोपेच्या गोळ्या खावू घालत होती. वडील झोपल्यानंतर ती त्याच्या प्रियकरासोबत फोनवर तासनतास गप्पा मारत होती.

झोपेच्या गोळ्या खायला घालून केला खून
पोलीस ठाण्याचे अधिकारी गुरचण सिंह यांनी सांगितले की, पल्लासोर गावात राहणाऱ्या सिमर कौर या महिलेने आपल्या पतीला रात्रीच्या जेवणातून झोपेच्या गोळ्या खाऊ घालून जीवे मारले. पतीला मारण्याचा कट आगोदरच ठरला असल्याचे सिंह यांनी सांगितले. मृत व्यक्तीच्या पत्नीला अटक करण्यात आली असून तिच्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे. मात्र, तिचा प्रियकर अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून

पोलीस त्याच्या मागावर आहेत.
सिमर कौरने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, लवप्रीत याच्या मदतीने तिने पहिल्यांदा आपल्या पतीला जेवणातून झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या. त्यानंतर पतीचा गळा आवळून खून केला. पतीचा मृत्यू झाल्यानंतर प्रियकरासोबत पळून गेल्याचे पोलिसांना सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –