धक्कादायक ! दारू आणायला उशीर झाल्याने पत्नीचा खून

मुंबई पोलीसनामा ऑनलाईन : दारूड्या पतीने पत्नीला दारू आणायला पाठवले. मात्र पत्नीला दारू आणायला उशीर झाल्याने मुलांसमोर बेदम मारहाण करत पत्नीचा खून केला. ही घटना मुंब्रा येथील शिवाजीनगर भागात समोर आला आहे.

संतोषी पुरवबिया असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रविण पुरबिया याला पोलिसांनी अटक केली आहे.परबिया कुटुंब शिवाजीनगर भागातील शिवविलास पॅलेस इमारतीमध्ये राहतात. दाम्पत्याला ७ वर्षांची मुलगी आणि ३ वर्षांचा मुलगा आहे. गुरुवारी दुपारी प्रविण परबिया कामावरून घरी आला. त्याने संतोषीला दारू आणण्यासाठी पाठवले. त्यानंतर तिला दारू आणण्यास उशीर झाला.

तिला उशीर झाल्याने त्याने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिला मुलांसमोरच लाकडी दांडक्य़ाने बेदम मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला. औषध प्यायल्याने पत्नीचा मृत्यू झाला असे प्रविणणे पोलिसांना स्वत:च सांगितले. मात्र पोलिसांनी तपास केल्यावर त्याने पत्नीचा खून केल्याचे समोर आले.

आरोग्याविषयक वृत्त

मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेणे आरोग्यासाठी घातक

अपचनाच्या समस्येसाठी ‘वज्रासन’ फायद्याचे

‘इन्सेफेलाईटीस’चे थैमान, बिहारमध्ये ६६ मुलांचा मृत्यू

केळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे

You might also like