जवानाच्या पत्नीचं शेजार्‍यावर ‘जडलं’ प्रेम, ‘अनैतिक’ संबंधास अडसर ठरणार्‍या ‘फौजी’ चा ‘सोडीयम सायनाईट’ गोळीनं खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पती आर्मीमध्ये असताना शेजारी राहणाऱ्या तरुणावर पत्नीचे सूत जुळले. सुट्टीला घरी आल्यानंतर दोघांमध्ये याच कारणावरून भांडण होऊ लागले. शेवटी पत्नी आणि तिच्या प्रियकराने अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढला. पाण्यामधून ‘सोडीयम सायनाईट’ केमिकलची गोळी देऊन खून केला. त्यांनंतर मित्रांच्या मदतीने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह पुणे ग्रामीणच्या राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकून दिला. पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला असून पत्नीसह चौघांना अटक केली आहे.

संजय पांडुरंग भोसले (३८, रा. रहाटणी) या फौजीचा खून केला आहे. तर पत्नी शितल संजय भोसले (२९, रा. रहाटणी), योगेश कमलाकर कदम (२९, रा. काळेवाडी), मनीष नारायण मदने (३२, रा. काळेवाडी) आणि राहुल अशोक काळे (३५, रा. काळेवाडी) या चौघांना अटक केली आहे.

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; संजय भोसले हे मिलेटरी मध्ये होते. तर त्यांची पत्नी शितल ही रहाटणी येथे राहत होती. पती नोकरीवर असताना तिचे योगेश याच्यासोबत प्रेम संबंध जुळले. याची माहिती पती संजय यांना कळाली. यातून दोघांमध्ये नेहमी भांडण होत होते. यातून आपल्या अनेतिक संबंधातील काटा काढण्याचे शितल आणि योगेश या दोघांनी ठरवले. त्यानुसार सहा महिन्यांपूर्वी गाडीने अपघात घडवून, संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही.

काही दिवसांपूर्वी संजय सुट्टीसाठी आले होते. यावेळी डी फार्मसी असलेली शितल आणि केमिकल कंपनीत काम करणारा योगेश यांनी खतरनाक प्लॅन केला. ‘सोडीयम सायनाईट’ केमिकलची गोळी आणून ती पाण्यात टाकली. आणि ते पाणी संजय यांना प्यायला दिले. यात संजय यांचा मृत्यू झाला. त्यानंतर योगेश याने त्याचे मित्र राहुल आणि मनीष यांच्या मदतीने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकून दिला. तपास वाकड पोलीस करत आहेत.

Visit : Policenama.com