अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीवर कटरने सपासप वार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अनैतिक संबंधाच्या संशयावरून तोंड दाबून पत्नीच्या गळ्यावर कटरने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना गारगोटी येथील अवधूत कॉलनीत घडली आहे. या घटनेत पत्नी विद्या किशोर कांबळे (वय-38 रा. गारगोटी) या गंभीर जखमी झाल्या असून वर्मी घाव बसल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणात पती किशोर शिवराम कांबळे (वय-45) याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी किशोर कांबळे हा एस.टी. महामंडळामध्ये चालक पदावर कार्य़रत आहे. त्याला पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यातून त्याने बुधवारी पत्नीशी वाद घातला. वाद विकोपाला जाऊन त्याने थेट पत्नीच्या गळ्यावर कटरने सपासप वार केले. त्याचवेळी मुलीने किशोरच्या हातातून धारदार कटर हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. वर्मी हल्ल्यामुळे विद्या यांची प्रकृती चिताजनक आहे. तिच्यावर कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काही महिन्यापासून आरोपी किशोर हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातूनच त्यांच्यामध्ये नेहमी भांडण होत होती. त्याने पत्नीला यापूर्वी अनेक वेळा मारहाण केली. कुटुंबातील नातेवाईकांनी त्यांच्यामध्ये समेट घडविण्याचा प्रयत्न केला मात्र, संशयाचे भूत काही केल्या आरोपीच्या डोक्यातू जात नव्हते. त्यातून त्याने हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like