खळबळजनक ! पैशांच्या वादातून पतीने दुसऱ्या पत्नीचा केला खून

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – पैशांच्या कारणावरून होणाऱ्या वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची खळबजनक घटना घडली आहे. ही घटना आंबिवली परिसरात शनिवारी (दि. 30) सकाळी घडली असून खडकपाडा पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पैशांच्या वादातून दोघांमध्ये नेहमी वाद होत होते.

मालन बाळू खरात असे खून झालेल्या महिचे नाव आहे. तर खडकपाडा पोलिसांनी पती बाळू खऱात (वय-45) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मयत मालन ही आरोपी बाळू खरात याची दुसरी पत्नी होती. तर आरोपी बाळूला दारुचे व्यसन होते. त्यांच्यामध्ये पैशावरून सतत वाद होत होते.

तिपन्नानगर परिसरात राहणारा बाळू भंगार विक्रेता होता. दोन लग्न केलेल्या बाळूचे दुसरी पत्नी मालन हिच्यासोबत पैशावरून नेहमी भांडण होत होते. दारुच्या नशेत बाळू नेहमीच तिला मारहाण करत हता. शुक्रवारी रात्रीदेखील दारुच्या नशेत असलेल्या बाळूचे मालनसोबत भांडण झाले होत. याच भांडणाच्या रागातून आरोपी बाळूने शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास पत्नी मालनचा गळा दाबून खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत.