पुण्यात आजारपणाला कंटाळून गळा व नाक दाबून पत्नीचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पत्नीच्या आजारपणाला कंटाळून तिचा गळा व नाक दाबून पतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमासार वडगाव बुद्रूक येथे घडला. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

सोनाली बाबु शेख (वय ३०वर्षे, रा.रघुनंदन हॉल जवळील झोपडपट्टी, वडगाव बुद्रुक सिंहगड रोड, पुणे) असे खुन करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. तर तिचा पती बाबु राजू शेख (वय ३५ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे.

बाबू शेख हा भंगारचा व्यवसाय करतो. मागील काही दिवसांपासून सोनाली क्षयरोगाने त्रस्त होती. तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे त्यांच्यात काही दिवस भांडण होत होते. त्यानंतर त्यांच्यात शुक्रवारी सायंकाळी कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी तिच्या पतीने तिचा दारूच्या नशेत खुन केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हलाखीची आर्थिक परिस्थिती
सोनाली व तिचा पती परिसरात कचरा वेचण्याचे काम करीत होते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. ते मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महा मार्गावरील सेवा रस्स्यावर वडगाव बुद्रुक येथे झोपडी टाकुन राहत होते. त्यांना एक मुलगा व दोन मुली ह्या लहानच आहेत .