home page top 1

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या पतीचे निधन  

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांचे पती अजय बबनराव इंगवले (वय ४३, सध्या रा. ऋतुपर्ण सोसायटी, बाणेर, मुळगाव – अमरावती) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने रविवारी निधन झाले. आज सकाळी बाणेर येथे असताना त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

स्मार्तना पाटील या पिंपरी चिंचवड पोलीस आय़ुक्तालयातील पहिल्या पोलीस उपायुक्त म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यावेळी त्या पुण्यात राहात होत्या. परंतु काही दिवसांपुर्वी त्यांची बदली ठाणे येथे झाली आहे. तर त्यांचे पती पुण्यात बाणेर येथे राहण्यास होते. नेहमीप्रमाणे आज सकाळी स्मार्तना पाटील यांनी फोन केला. तेव्हा अजय इंगवले यांनी काही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या चालकाला पाठवून दिले. तेव्हा ते बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यानंतर चालकाने त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना उपचारापुर्वीच मृत घोषित केले. त्यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार मुळगावी अमरावती येथे करण्यात येणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like