दीर-भावजयीचे आक्षेपार्ह ‘संबंध’, प्राध्यापक भावानं केलं ‘असं’ काही

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बिहारमधील पटणा येथून भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आपल्या भावाच्या बायकोसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून संख्या भावानेच आपल्या भावाची सुपारी देऊन त्याची हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला असून आरोपीला अटक केली आहे.

महाविद्यालयातील प्राध्यापक असणाऱ्या शिव नारायण राम यांच्या पत्नीचे तिच्या मर्चंड नेव्हीमध्ये काम करणाऱ्या दिराशी अनैतिक संबंध होते. या प्रकरणावरून भांडण सुरु झाल्याने लहान भाऊ वीरेंद्रने मोठ्या भावाच्या हत्येची सुपारी दिली. २९ जानेवारी रोजी टीपीएस महाविद्यालयात जात असतांना प्राध्यापकास गोळ्या घालून ठार मारण्यात आले. पोलिसांनी वीरेंद्रला पकडले असता या प्रकरणाचा खुलासा झाला.

या हत्येप्रकरणी सर्व 6 गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून हत्येमध्ये वापरलेली दोन वाहने आणि एक रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तापासासाठी एक टीम तयार करण्यात आली. या हत्येचे तार त्याच्या घराशी जोडलेले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विचारणा केली असता, त्यांच्या धाकट्या भावाचे पटना येथील टीपीएस महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या प्रोफेसर शिव नारायण राम यांच्याशी संबंध असल्याचे निदर्शनास आले.

मृत प्राध्यापक आपल्या पत्नीसह राहत होता, त्या दोघांमध्ये सतत भांडणे होत असे. यानंतर, धाकट्या भावाने पूर्ण नियोजन करत भावाच्या हत्येसाठी 2 लाख रुपयांची सुपारी दिली. दोन महिने संपूर्ण कार्यक्रमाची आखणी केली. त्यानंतर ही घटना घडवून आणली.