कलयुगात ‘महाभारत’ ? जुगारात ‘त्यानं’ लावलं पत्नीला पणाला, जिंकल्यानंतर मित्रांकडून सामुहिक बलात्कार

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील जैनपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. व्यसनी पतीने जुगारामध्ये आपल्या पत्नीला पणाला लावले. जुगारात मित्राच्या पत्नीला जिंकल्यानंतर त्याच्या मित्रांनी पत्नीवर सामुहीक बलात्कार केला. महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला मात्र पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली नाही. अखेर पीडित महिलेने न्यायालयात दाद मागितल्यावर पोलिसांनी कारवाई केली.

पीडित महिलेच्या पतीला दारू आणि जुगार खेळण्याचे व्यसन आहे. तो आपल्या मित्रांसोबत जुगार खेळत होता. जुगारामध्ये तो त्याच्याकडचे सर्व पैसे हराला. त्याच्याकडे जुगारात लावण्यासाठी त्याच्याकडे काहीच शिल्लक राहिले नाही. त्यामुळे त्याने आपल्या पत्नीलाच पणाला लावले. मात्र त्याचे दुर्भाग्य तो जुगारात पत्नीलाही गमावून बसला. जुगारात पत्नीला जिंकलेल्या मित्रांनी त्याच्या पत्नीवर आळीपाळीने सामुहीक बलात्कार केला.

पत्नीने याप्रकरणी पोलीस ठाण्यात पतीच्या दोन मित्रांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला मात्र, आरोपींवर कोणतीच कारवाई केली नाही. पीडित महिलेने पोलिसांकडे एफआयआर कॉपीची मागणी केली. मात्र, पोलिसांनी एफआयआरची प्रत देण्यास नकार दिली. आरोपींवर कारवाई केली नसल्याने पीडितेने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने पोलिसांना आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश देत गुन्हा दाखल केल्याची एफआयआर प्रत न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त