शार्कवर सतत बुक्के मारून पतीनं पत्नीला मृत्यूच्या ‘दाढे’तून काढले बाहेर, सर्वत्र होतेय ‘कौतुक’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : प्रत्येक स्त्रीसाठी तिचा नवरा हिरो असतो. ऑस्ट्रेलियामधील एका व्यक्तीने हे सिद्ध केले आहे. या व्यक्तीने समुद्रातील सर्वात धोकादायक मासा शार्कशी लढा देत आपल्या पत्नीला मृत्यूच्या दारातून बाहेर आणले. माहितीनुसार, ही घटना न्यू साउथ वेल्स प्रांतातील पोर्ट मॅकरीनमधील शेली तटची आहे. नवऱ्याचे नाव समोर आले नाही. नवरा बायको (डोयले) हे शेली किनाऱ्यावर सर्फिग करत होते. या दरम्यान, एका साडेसहा फूट लांब शार्कने चे डोयलेचे पाय आपल्या जबड्यात पकडले. ती सर्फिगबोटमधून समुद्रात पडली.

नवऱ्याकडे कोणतेही शस्त्र नव्हते, परंतु त्याने कोणत्याही भीतीशिवाय शार्कवर उडी मारली आणि त्याच्या डोक्यावर बुक्की मारण्यास सुरुवात केली. डोयलेचे पाय सोडेपर्यंत नवरा शार्कच्या डोक्यावर हल्ला करत राहिला. त्याने आपल्या पत्नीला पाण्यातून बाहेर आणले जिथे तिला प्राथमिक उपचार देण्यात आले आणि नंतर पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात नेण्यात आले. डोयलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे, परंतु तिची प्रकृती ठीक आहे. पियर्सने त्या व्यक्तीचे कौतुक करताना सांगितले की, त्याने खऱ्या अर्थाने बरेच शौर्य दाखविले. घटनेनंतर बीच बंद करण्यात आला.

2019 साली अशीच घटना उत्तराखंडमध्ये घडली. पौरी जिल्ह्यातील बिरखल ब्लॉकच्या वेकुंदाई गावात एका 11 वर्षाच्या मुलीने आपल्या चार वर्षांच्या भावाचा जीव वाचवला. यासाठी तिने बिबट्याशी लढा दिला. यादरम्यान, तिने आपल्या भावाला छातीवर चिकटून बिबट्याचे हल्ले झेलत राहिली. मुलाच्या धैर्यासमोर बिबट्याचा देखील पराभव झाला. मात्र, या हल्ल्यात मुलीला गंभीर दुखापत झाली. धाकट्या भावाचा जीव वाचविण्यासाठी निर्भय धैर्य दाखवत बिबट्याशी लढणाऱ्या राखीला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यात आला.