‘सती’च्या कड्यावरून पतीने केला पत्नीचा कडेलोट ; सप्तशृंगी गडावरील घटना

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – सप्तशृंगी गडावर देवीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या पतीने पत्नीचा सतीच्या कड्यावरून पत्नीला ढकलून दिल्याची घटना आज घडली आहे. मुळचे मध्यप्रदेशचे असलेले नवदांपत्य देवीच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी परिसरात फिरून त्यांनी फोटो काढले. पत्नीला सती कडा दाखवण्यासाठी घेऊन जात पतीने तिला धक्का दिला. नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पतीला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

संगीता बाबूलाल काळे (रा. मुरादपूर, जि. गुन्हा, मध्यप्रदेश) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी बाबूलाल काळे याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता आणि बाबुलाल हे नवदांपत्य रविवारी देवीच्या दर्शनासाठी नाशिकमध्ये आले होते. रविवारी त्यांनी एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. आज ते देवीचे दर्शन घेण्यासाठी गडावर आले होते. दर्शन घेतल्यानंतर परिसरात पाहण्यासाठी गेले.
पतीने या गडावर असलेला सती कडा दाखवण्यासाठी पत्नी संगीताला घेऊन गेला. कडा दाखवत असताना त्याने तिला धक्का दिला. त्यामुळे ती खोल दरीत कोसळल्याने गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, बाबूलालने पत्नी संगीताला धक्का देताना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी पाहिले. नागरिकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली असता बाबुलाल पळून जाऊ लागला. नागरिकांनी आणि त्या ठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, सचिन राऊत, योगेश गवळी करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ 

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या 

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून 

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू 

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ 

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे 

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार 

 

Loading...
You might also like