संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

पोलीसनामा ऑनलाईन टीम : राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातून पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. जिथे पतीने आपल्या साथीदारांसह स्वतःच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. जलोर कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये एका महिलेने तिच्या विवाहित मुलीवर बलात्कार करणाऱ्या पती आणि तिच्या सहकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेचा नवरा सिरोहीच्या मनादर गावात काम करतो. पीडित मुलगी 3 मुलांची आई असून ती तिच्या महेर जालोरमध्ये राहत होती. 12 जानेवारी रोजी पीडितेचा नवरा आला आणि तिला मोटारसायकलवरून मनादर गावी घेऊन गेला. पीडितेचा आरोप आहे की, तिला आधी मारहाण करण्यात आली आणि लोखंडी दाराला तिचे पाय बांधले. अर्जुनसिंग, छगना राम, नारायण तिथे दारूच्या नसेल बसले होते. यानंतर तिच्या नवऱ्यासह इतरांनी बलात्कार केला.

दुसर्‍या दिवशी पीडितेचे पालक आल्यावर घटनेची माहिती मिळाली. यानंतर पीडितेला जलोरचे पोलिस अधीक्षक श्याम सिंह यांच्यासमोर हजर केले, त्यांनी ही बाब गांभीर्याने घेत एस.पी. कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. जलोरचे डेप्युटी एसपी कैलाश कुमार म्हणाले की, पोलिस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याच वेळी, वैद्यकीय पथक पीडितेच्या आरोग्याची चौकशी करीत आहे. डिप्टी एसपीने सांगितले की, महिलेने आपल्या मुलीवर झालेल्या बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पीडितेवर उपचार सुरू असून कलम 161अन्वये पीडितेचा जबाब नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी पथक तयार केले असून आरोपींचा शोध सुरू आहे.