धक्कादायक ! बेडरुममध्ये डॉक्टर पत्नीची नग्न छायाचित्रे काढून छळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पती आणि इतरांनी बेडरूममधील नग्न अवस्थेत फोटो काढून त्याआधारे लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील वरळी येथे राहणाऱ्या एका डॉक्टर महिलेने पती व कुटुंबियांविरोधात तक्रार केली आहे. तिने माहेरी बंगळूरू मध्ये आल्यावर ही तक्रार दिली आहे.

याप्रकरणी पती रित्विक हेगडे, त्याची आई सुतारिता आणि बहीण तनुश्री यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत महिलेने २०१३ मध्ये रित्विक हेगडे याच्यासोबत लग्न केले होते. लग्न झाल्यानंतर घऱातील सर्वांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर घरातील सदस्य तिला शिव्या देत होते. तसेच टोमणेही मारत होते. पती आणि कुटुंबातील इतरांनी माझे नग्न फोटो काढून त्याआधारे माझा छळ केला अशी तक्रार महिलेने बंगळूरू येथे पोलिसांकडे केली आहे.