मध्यरात्री पती अचानक घरी आल्यानं पत्नी ‘घाबरली’, संशय आल्यानं ‘बेड’खाली पाहिलं अन्…

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – प्रवासासाठी निघालेल्या एका व्यक्तीची रेल्वे सुटल्याने तो घरी परत आला आणि पाहतो तर काय, आपली पत्नी तिच्या प्रियकरासोबत बेडरुमधे बसलेली आहे. हे पाहताच त्या व्यक्तीने मोठा गोंधळ घालायला सुरुवात केली, याबाबतची रीतसर तक्रार देखील विजय नगरच्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेली आहे.

विजय नगरच्या परिसरात एक व्यक्ती आपल्या आई वडील आणि पत्नीसोबत राहत होता. पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी व्यक्ती आपल्या आई वडिलांसोबत प्रवासावर निघाला होता. आजारी असल्याचे कारण देत पत्नीने प्रवासासाठी जाण्यास नकार दिला. प्रवास रेल्वेने होणार असल्यामुळे त्या व्यक्तीने पत्नीला सांगितले की आम्ही थोड्याच दिवसात परत येऊ. पत्नीने घरीच एकटीच होती मात्र त्या व्यक्तीची गाडी मिस झाल्याने तो पुन्हा घरी आला.

जेव्हा तो व्यक्ती पुन्हा घरी पोहचला तर त्याची पत्नी खूप घाबरलेल्या अवस्थेत होती आणि हे पाहूनच त्या व्यक्तीला संशय आला. त्याने घरात पाहणी केली असता बेडखाली त्याला लपलेला एक तरुण आढळला. मग त्या व्यक्तीने त्या तरुणाला बाहेर काढत चांगलाच चोप दिला, यामुळे झालेल्या गोंधळाने आजूबाजूचे लोक देखील जमा झाले. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले, पोलिसांनी दोनीही व्यक्तींना ताब्यात घेऊन अधिक तपास सुरु केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्यामवीर सिंह यांनी दिली.

Visit : Policenama.com