पतीने दिले अर्धांगिनीला जीवदान 

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

ससूनमध्ये पतीने पत्नीला मूत्रपिंड देऊन जिवनदान दिले. आज (दि. १३) शुक्रवार रोजी सकाळी मूत्रपिंडप्रत्यारोपन शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. यासाठी अापल्या अर्धांगिनीला वाचविण्यासाठी पतीने स्वत:चा जीव धाेक्यात घालून मूत्रपिंड दान केले. उत्तमराव गोळे असे मूत्रपिंड दान केलेल्या पतीचे नाव असून ते महादेवनगर, हडपसर येथिल रहिवाशी अाहेत.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c9e5df84-86c3-11e8-b287-6de770f7770c’]

या बाबत सविस्तर वृत्त असे की, गाेळे यांच्या पत्नीला किडनीविकार झाला होता दरम्यान त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचाराचा खर्च परवडत नसल्याने या महिलेने ससून रुग्णालयात डायलिसिस सरु केले. यानंतर ससूनच्या तज्ञ् डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. दरम्यान गाेळे यांनी मूत्रपिंड दानाकरिता संमती दर्शवली. मात्र मूत्रपिंडप्रत्यारोपणाचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. यावेळी ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांना ही  बाब समजल्यावर देणगीच्या माध्यमातून या रुग्णाचे मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याचे ठरवले. यानंतर मूत्रपिंडप्रत्यारोपन शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली.

हि शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी डॉ. सुरेश पाटणकर, डॉ.भालचंद्र काश्यपी, डॉ.अभय सदरे, डॉ. निरंजन आंबेकर, डॉ. धनेश  कामेरकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ.अभिजीत पाटील, डॉ. अमित बंगाळे,  डॉ. सागर भालेराव, डॉ. शंकर  मुंडे, डॉ. विद्या केळकर, डॉ. सुरेखा शिंदे, डॉ.रोहित संचेती, डॉ.सुरज जाधवर यांचा समावेश होता. तसेच डॉक्टर हरीश टाटिया, एम.बी. शेळके, सय्यद सिस्टर, अवयव प्रत्यारोपन समन्व्यक अर्जुन राठोड यांनी मोलाची मदत केली.
[amazon_link asins=’B0789G2XWZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d25d138a-86c3-11e8-a2a9-1bac0c7f43e3′]

डॉ.अजय चंदनवाले यांनी आवाहन केले कि अजून १५ रुग्ण ससूनच्या मूत्रपिंड प्रत्यारोपनाच्या प्रतीक्षा यादीवर आहेत आणि यकृत प्रत्यारोपणसाठी ५ रुग्ण  नोंदणी प्रक्रियेत आहेत. दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्था यांनी देणगीच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा ज्यामुळे प्रत्यारोपनाचा खर्च न परवडणारी कुटुंबे सुद्धा प्रत्यारोपनाचा पर्याय स्वीकारतील.

हे जिवंत दाता असलेले तिसरे मूत्र पिंड प्रत्यारोपण आहे तर ससूनमधले एकूण सातवे आहे.