अरे देवा ! पत्नीला सरकारी नोकरी लावली, पतीची ‘पोटगी’साठी न्यायालयात ‘धाव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पत्नीला सरकारी नोकरी लावण्यासाठी 5 लाख रुपये खर्च केले. मात्र, नोकरी लागल्यानंतर पत्नी पतीचे घर सोडून निघून गेली. सरकारी नोकरी असलेल्या पत्नीकडून पोटगी मिळावी यासाठी एका बेरोजगार पतीने न्यायालयात धाव घते पत्नीकडून पोटगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. आता या अर्जावर 16 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील बलेई भगवंतपूर येथील रहिवासी असलेल्या योगेश कुमारने आपल्या पत्नीला सकरारी नोकरी लागावी यासाठी पाच लाख रुपये खर्च केले. मात्र, नोकरी लागल्यानंतर पत्नी घर सोडून निघून गेली. त्यामुळे योगेश कुमारने वकिलामार्फत सोमवारी न्यायालयात पोटगीसाठी अर्ज दाखल केला आहे. योगेशचे जून 2015 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर त्याचे आणि पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद होत होते.

पत्नी सतत माहेरी जात असताना देखील तो तीच्या सोबत रहात होता. या दरम्यान, योगेशचे सासरे यशवीर सिंह हे योगेशला म्हणाले जर पाच लाख रुपये खर्च केले तर पत्नीला सरकारी नोकरी लावू शकतात. सासऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून योगेशने नातेवाईकांकडून पैसे उसने घेऊन पाच लाख रुपये सासरे यशवीर सिंह यांना दिले. 31 मे 2016 रोजी त्याच्या पत्नीला वन विभागात सरकारी नोकरी मिळाली. ती सध्या बरेली डीएफओ कार्यालयात कार्य़रत आहे.

एकेदिवशी योगेश कुमारची पत्नी घरी कोणी नसताना तीन लाख रुपयांचे दागिने घेऊन घर सोडून निघून गेली. तिची बऱ्याचदा समजूत काढली. मात्र ती घरी येण्यास तयार नव्हती. अखेर योगेशने न्यायालयात याचिका दाखल केली. तरी देखील ती परत येण्यास तयार झाली नाही. त्यामुळे पत्नीकडून पोटगी मिळावी यासाठी योगेशने कोर्टात अर्ज दाखल केला आहे. पत्नीला सरकारी नोकरी असून तिला 28 हजार रुपये पगार आहे. तर आपण बेरोजगार असून आपल्याला पत्नीकडून 14 हजार रुपयांची पोटगी मिळावी असा अर्ज कोर्टात दाखल केला आहे.

Visit : policenama.com