पतीने पूर्ण केले पत्नीच्या विदेश शिक्षणाचे स्वप्न, पत्नीने दिले ‘हे’ रिटर्न गिफ्ट

बोहना : वृत्तसंस्था – पत्नीच्या उच्च शिक्षणासाठी पतीने तिला कॅनडात पाठवले. तिच्या शिक्षणाचा सर्व खर्च करून तिचे शिक्षण पूर्ण केले. कॅनडात जाऊन शिक्षण घेतल्यानंतर तिथे नोकरी शोधून नवऱ्यालाही कॅनडात बोलवण्याच दोघांनी निश्चित केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर पत्नी भारतात पुन्हा परत आली.

मात्र, तिने भारतात आल्यानंतर दुसऱ्याच एका युवकाशी लग्न करून त्याच्यासोबत कॅनडाला परत गेली. पतीने तिच्या शिक्षणासाठी २५ लाख रुपये खर्च केले. पत्नीची उच्च शिक्षणाची ईच्छा पूर्ण करून देखील तिने विश्वासघात केल्याने पती जसप्रीत सिंह यांनी पोलीस ठाण्यात पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पतीने दिलेल्या फिर्य़ादेत म्हटले आहे, पत्नीने विश्वासघात केला आहे. तिने आपल्याला घटस्फोट न देता दुसरे लग्न केले. तिने लग्न केलेल्याचे समजून देखील दिले नाही. कॅनडामध्ये शिक्षण पूर्ण करून तिला त्या ठिकाणी नोकरी लागली होती. ती लुधीयानात परत आल्यानंतर दुसऱ्या युवकासोबत लग्न करून पुन्हा कॅनडात निघून गेली. पतीच्या फिर्य़ादेवरून पोलिसांनी एनआरआय बायको आणि तिच्या नातेवाईकांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी पत्नीच्या वडिलांना अटक केली आहे. जसप्रीत हे पंजाबमधील संघा गावचे रहिवाशी आहेत. त्यांचे बोहना गावातील एका मुलीशी लग्न झाले. लग्नानंतर सुनेला विदेशात शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय जसप्रित आणि त्याच्या घरच्यांनी घेतला. पत्नीला विदेशात नोकरी लगल्यानंतर ती पतीला कॅनडात बोलावून घेण्याच ठरले होते. मात्र पत्नीने कॅनडात शिक्षण पूर्ण करून भारतात आल्यानंतर ती दुसऱ्या युवासोबत लग्न करून कॅनडात निघून गेली.

जसप्रीतच्या घरच्यांनी तिला सप्टेंबर २०११ मध्ये कॅनडात शिक्षणासाठी पाठवले. तिचे कॅनडात तीन वर्ष शिक्षण झाले. दरम्यान, जसप्रितच्या घरच्यांनी तिच्या शिक्षणासाठी २५ लाख ७० हजार रुपये खर्च केले. नोव्हेंबर २०१५ ती शिक्षण पूर्ण करून लुधीयानाला परत आली आणि या ठिकाणच्या एका युवकासोबत लग्न करून कॅनडला निघून गेली असल्याचा आरोप जसप्रीतने केला आहे.