‘प्रियकराबरोबर’ दिसली ‘पत्नी’, पतीने दोघांची केली ‘गोळ्या’ झाडून ‘हत्या’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – एका व्यक्तीने आपल्यापासून वेगळ्या राहणाऱ्या पत्नीची आणि तिच्या नव्या प्रियकराची गोळ्या झाडून हत्या केली. हे प्रकरण अमेरिकेतील ओकलाहोमाच्या डुनकॅनचे आहे. पोलिसांच्या मते, वॉलमार्टच्या शॉपिंग सेंटरच्या बाहेर ही धक्कादायक घटना घडली.

पोलिसांनी सांगितले की महिला आणि तिच्या प्रियकराचा मृतदेह एका चारचाकीमध्ये मिळाला. घटनास्थळावर पोहचलेल्या नातेवाइकांनी सांगितले की महिला आणि त्यांच्या पतीच्या दरम्यान वाद झाला आहे. पोलीस आता या हत्येचा तपास करत आहेत.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की गोळीबार करणाऱ्याने गोळ्यांच्या 9 फेऱ्या झाडल्या. ज्यात 2 लोकांचा मृत्यू झाला. जेव्हा शस्त्रास्त्र असलेल्या एका व्यक्तीशी आरोपीचा सामना झाला तेव्हा आरोपीने स्वत:वर बंदूक रोखली.

ही घटना सोमवारी सकाळी जवळपास 10 च्या सुमारास घडली. घटनास्थळावरुन पोलिसांनी एक बंदूक जप्त केली. वॉलमार्टच्या एका प्रवक्त्याने सांगितले की लोकांनी भरलेले स्टोर रिक्त करण्यात आले नाही. ओकलाहोमाची ही घटना कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर काही तासाने घडली. कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या गोळीबारात 4 लोकांचा मृत्यू झाला.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like