नातवानेच केली घरातील ५ लाखांच्या दागिन्यांची चोरी

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

अल्पवयीन नातवानेच घरातील कपाटात ठेवलेले ४ लाख ५३ हजार ९०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नातवाविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ६ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमरास घोरपेठेत घडला असून ७८ वर्षीय आजीने खडक पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घटनेच्या वेळी किचनमध्ये साहित्य ठेवण्यासाठी गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेत अल्पवयीन नातवाने हॉलमधील कपाट उघडले. कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले ४ लाख ५३ हजार ९०० रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरुन नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ec4d4339-cee1-11e8-8a48-07dfaf8d0c71′]
प्रवासात महिलेच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला
पुणे : एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारुन १ लाख २० हजार रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले. हा प्रकार शुक्रवारी (दि.१२) दुपारी एकच्या सुमरास स्वारगेट एसटी बस स्टँडजवळ घडला. एका ६७ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिला या स्वारगेट ते कल्याण या बसने प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी असल्याने त्या बसच्या दारात उभे राहून प्रवास करत होत्या. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या जवळ असलेले दागिने चोरुन नेले. पुढील तपास स्वारगेट पोलीस करित आहेत.
[amazon_link asins=’B077RTXJ66,B01L3I1BF0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f5b4a49a-cee1-11e8-bd3e-232e198988a4′]