पुण्यातील ‘तनिका’ कपडे धुण्याची ‘ऑर्डर’ देत ‘प्रणय’ला, वैतागल्यानं ‘त्यानं’ हे पाऊल उचलल्यानं सगळेच अवाक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कपडे धुण्यापासून घरघुती कामांमुळे सतत पत्नी त्रास देत असल्याने कंटाळून पतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उच्चभ्रु अशा मगरपट्टा सिटीत हा प्रकार घडला आहे.

प्रणय मिलिंद खुटाळ (वय 29, रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी तनिका खुटाळ हिच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रणय याची आई संगिता खुटाळ (वय 49,रा. लिंबोदा,ता.हतोद, जि. इंदोर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणय आणि तनिकाचे यांचे 2015 मध्ये रितीरिवाजाने विवाह झाला आहे. तनिका या गृहिणी असून प्रणय एका खासगी कंपनीत नोकरीस होता. दोघेही मगरपट्टा सिटीतील जिनिया इमारतीत राहायला होते. त्यांना दहा महिन्यांचा एक मुलगा आहे.

दरम्यान, घरातील कामे तसेच कपडे धुत नसल्याने तनिका ही सतत प्रणय याच्याशी वाद घालत होती. तो कामावर जाण्यापुर्वी त्याला कपडे धुण्यास सांगत असे. तर, सातत्याने प्रणयची मानहानी करीत होती. तनिकाने स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी करून घेण्याच्या कारणातूनही प्रणयला वारंवार त्रास देत असे. तनिका हिच्या सततच्या शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळला होता. गेल्या महिन्यात कारणांवरून वाद झाल्यानंतर प्रणय याने पंख्याला बेडशीटच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्याचा तपास करण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी तनिका हिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक व्ही. ए. भाबड करीत आहेत.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like