पत्नीच्या नकळत पतीने घरात बसवला कॅमेरा, त्यानंतर धक्कादायक प्रकार आला समोर !

लखनऊ : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ आश्चर्यचकीत करणारे असतात तर काही व्हिडीओ धक्कादायक असतात. तर काही व्हीडीओमधून एखाद्या व्यक्तीच्या कृत्याची पोलखोल होते. अशीच एक उत्तर प्रदमधील घटना व्हिडीओमुळे समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

एका व्यक्तीला त्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी सांगितले, की तुमच्या घरातून सतत लहान मुलांचा रडण्याचा आवाज येतो. त्यामुळे आम्हाला त्रास होतो अशी तक्रार शेजाऱ्यांनी केली. शेजाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर त्या व्यक्तीने पत्नीकडे यासंदर्भात विचारणा केली. मात्र पत्नीने शेजारी काहीही सांगतात, असे म्हणत शेजारी राहणाऱ्यांबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली.

शेजारी वारंवार पतीला सांगत होते की, तुमच्या घरातून सतत लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे पतीने एक शक्कल लढवत पत्नीच्या न कळत घरामध्ये एक छुपा कॅमेरा बसवला. काही दिवसांनी पतीने कॅमेरा तपासला असता, कॅमेऱ्यात कैद झालेले चित्रीकरण पाहून त्याला धक्का बसला. त्याने थेट पोलीस ठाणे गाठले.

पतीने कॅमेऱ्यातील चित्रीकरण पाहून तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्याच पत्नी विरोधात तक्रार केली. कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये पत्नी आपल्याच मुलांना अमानुषपणे मारहाण करत असल्याचे दिसत होते. पोलिसांनी विचारणा केली असता, पत्नीने मुलांना मारहाण करत असल्याची कबुली दिली. मात्र का करत होती हे मात्र तिने पोलिसांना सांगितले नाही. पोलीस तिच्याकडे कसून चौकशी करत आहेत, मात्र तिने अद्याप काहीही सांगितले नाही.