‘अश्‍लील’ फोटो अन् ‘ऑडिओ’ क्लीप हाती लागताच पतीनं पत्नीचा गळा घोटला

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन – पत्नीचे आक्षेपार्ह फोटो आणि ऑडीओ रेकॉर्डिंग आढळून आल्याने पतीने खून केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. मंगेश गवळे आणि मनोज थोरात या दोघांनाही अटक केली आहे. या दोघांनीच मृत महिलेच्या पतीला ऑडिओ क्लिप आणि फोटो पाठवल्याचा आरोप आहे.

महिलेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सांगितले कि, दोघं पती पत्नींमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होत असतं. त्यामुळे दोघे जण मुंबईवरून औरंगाबादला राहायला आले होते. तिच्या पतीने बजाजनगरमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता, त्याठिकाणी त्याची बहीण राहत असल्याने त्या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होत असतं. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला माहेरी नेले होते. सात सप्टेंबर रोजी पतीने तिला पुन्हा घरी आणलं.त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाल्याने त्याने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर तो पसार झाला आहे.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणातील ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे. तसेच पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपी मंगेश गवळे व मनोज थोरात यांनीच हे फोटो पाठवून हत्या करण्यासाठी पतीला चिथावणी दिल्याचे समोर आले आहे.

आरोग्यनामा ऑनलाइन –

You might also like