धक्कादायक ! मित्रांसह पतीच करत होता पत्नीवर बलात्कार, कारण जाणून व्हाल ‘हैराण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाबमधील तरनतारन येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका पतीने आपल्या मित्रांसह पत्नीला नशेचा पदार्थ देऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

मित्रांसह केले दुष्कर्म

हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या पतिने  गुरप्रीत सिंह याने जुन्या वैमन्यस्यातून हे कृत्य केले आहे. दुष्कर्म करण्याआधी तो तिला सफेद रंगाची गोळी खायला घालत असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. त्यानंतर ती बेशुद्ध होत असे. त्यानंतर मित्रांसह तो तिच्यावर बलात्कार करत असे.

मदतीची विंनती
तिने याविषयी अधिक सांगितले कि, यामध्ये तिची सासू आणि नणंद देखील सहभागी आहे. तिने पोलिसांना  मदतीची याचना केली असून आरोपींना कडक शिक्षेची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Visit : Policenama.com