… म्हणून ६७ वर्षाच्या पत्नीनेच दिला पतीच्या चितेला ‘अग्नी’

सिंदखेडराजा : पोलीसनाम ऑनलाइन – मेल्यानंतर आपल्या चितेला अग्नी देण्यासाठी वंशाला दिवा हवा या मानसिकतेपासून आपण अजून दूर गेलो नाही. वंशाच्या दिव्याची कसर आता मुलीही भरुन काढत आहेत. मात्र, अपत्यच नसलेल्या दाम्पत्याने काय करावे, याचा वस्तूपाठ सिंदखेडराजा तालुक्यातील आडगाव येथील वच्छलाबाई हिवाळे या ६७ वर्षाच्या महिलेने घालून दिला आहे. ७२ वर्षीच्या पतीच्या निधनानंतर त्यांच्या चितेला भडाग्नी कोण देणार? हा पश्न उपस्थित झाला. तेव्हा कसलाही विचार न करता त्यांनी स्वत: आपल्या पतीच्या चितेला अग्नी देऊन नवा आदर्श निर्माण केला.

आडगाव राजा येथील ७२ वर्षाचे हरीभाऊ हिवाळे आणि ६७ वर्षाच्या त्यांची पत्नी वच्छलाबाई या शेतकरी दाम्पत्याला अपत्य नसले तरी त्याचे दु:खही त्यांनी कधी व्यक्त केले नव्हते. शेतीवर आपला चरितार्थ चालवत होते.

दरम्यान, गेल्या दोन वर्षापूर्वी हरीभाऊ हिवाळे आजारी पडले. आणि २१ जून रोजी रात्री त्यांचे निधन झाले. शनिवारी अंत्यविधीसाठी नातेवाईक जमा झाले. त्यावेळी मृत हरीभाऊ यांना पाणी कोण पाजणार अशी चर्चा सुरू झाली. उपस्थितांच्या या चर्चेला पूर्णविराम देत वच्छलाबाई हिवाळे यांनी स्वत:च पुढे होऊन मृत पतीला पाणी पाजत अग्नी दिला.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?