पत्नीची छेड काढल्यावरून झालेल्या वादात पतीचा खून, मित्राला बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पत्नीवर वाईट नजर ठेवून तिची छेड काढणाऱ्या मित्राला जाब विचारल्याने झालेल्या भांडणात मित्रानेच पतीचा खून केल्याची खळबळजक घटना वडाळा येथे पांडीयन गल्लीत समोर आली आहे. काल रात्री साडेअकराच्या समारास हा खून करण्यात आला. दरम्यान याप्रकऱणी मारेकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

इब्राहिम अन्सारी (वय. २४) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर त्याचा मित्र इरफान ख्वाजा मोमीन (२२) याला वडाळा टी. टी. पोलिसांनी अटक केली आहे.

इरफान आणि इब्राहिम हे दोघे मित्र होते. मात्र इब्राहिमच्या पत्नीवर इऱफानची वाईट नजर होती. गेल्या ३ वर्षांपासून तो त्याच्या पत्नीची छेड काढत होता. त्याची तक्रार पत्नीने इब्राहिमकडे केली होती. त्यानंतर इरफान आणि इब्राहीम दोघांमध्ये वारंवार यावरून वाद होत होते. त्यानंतर रविवारी इरफानने इब्राहिमला गुलशन – ए- मदरसा येथे बोलवून घेतले. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर या वादातून इब्राहिमला इरफानने चाकूने भोसकून ठार मारले. तो घटनास्थळावरून पळून गेला. मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला अटक केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like