पत्नीपासून दुखी असलेल्या नवर्‍यांनी केलं मोठं आंदोलन, सरकारकडे केली वाचवण्याची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात महिलांच्या सुरक्षा आणि सन्मानासाठी अनेक कायदे बनवण्यात आले आहेत. मात्र पुरुषांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी अशा प्रकारचे कोणतेही कायदे बनवण्यात आलेले नाहीत. एखाद्या महिलेवर तिच्या पतीने लैंगिक अत्याचार केल्यानंतर ती पोलिसांत जाऊन तक्रार दाखल करू शकते मात्र पतीवर अत्याचार झाल्यास त्याने कुठे जायचे. यासाठी कोणताही पुरुष आयोग देखील अस्तित्वात नाही. त्यामुळे दिल्लीतील जंतर- मंतरवर काही पुरुषांनी आंदोलन केले असून यासाठी एक पुरुष आयोग देखील बनवला आहे.

PunjabKesari,Nari, Man crime

महिलांपेक्षा अधिक पुरुष करतात आत्महत्या
नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरोच्या माहितीनुसार, आत्महत्या करणारे अविवाहित पुरुष आणि महिला यांची संख्या जवळपास सारखीच आहे. तर विवाहित पुरांशी संख्या महिलांपेक्षा दुप्पट आहे. दरवर्षी जवळपास 91000 पुरुष आत्महत्या करत आहेत.

खोटे गुन्हे दाखल
आयटी कंपनीतील सेल्स मॅनेजर मनप्रीत सिंह यांचा विवाह 2009 मध्ये झाला होता. लग्नानंतर त्यांच्यात भांडणे होऊ लागली. त्यानंतर आपल्या 15 महिन्याच्या मुलाला घेऊन पत्नी माहेरी निघून गेली. त्याचबरोबर तिने सिंह यांच्या आईवर हुंडा आणि मारहाणीचा खोटा गुन्हा दाखल केला. त्यांच्या या घरच्या त्रासामुळे त्यांना आपली नोकरी देखील गमवावी लागली.

देशभरातून पुरुष एकत्र
या आंदोलनासाठी देशभरातून पुरुष एकत्र आले होते. पंजाब, तेलंगाना, इंदौर, ग्वालियर, जमशेदपुर आदी ठिकाणांहून पुरुष यासाठी आले होते.