Hutatma Express | …म्हणून पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस 3 ते 17 ऑक्टोबरदरम्यान बंद

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Hutatma Express | दौंड ते भाळवणी (Daund to Bhalavani) विभाग दरम्यान चालु असणा-या दुहेरीकरणाच्या कामांमुळे पुणे-सोलापूर (Pune-Solapur) धावणारी हुतात्मा एक्स्प्रेस (Hutatma Express) चौथ्यांदा रद्द केली गेली आहे. हुतात्मा एक्स्प्रेस 3 ऑक्टोबर 17 ऑक्टोबर दरम्यान ही गाडी रद्द करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. सोलापूर रेल्वे विभागांत दुहेरीकरणाचं काम अंतिंम टप्प्यात आलं आहे. तुर्तास हुतात्मा एक्स्प्रेस रद्द केली आहे.

सोलापूर रेल्वे विभागांत (Solapur Railway Division) भाळवणीजवळ दुहेरीकरणाचं काम सुरु आहे. दरम्यान, 3 ते 17 ऑक्टोबरदरम्यान ज्या प्रवाशांनी हुतात्मा एक्सप्रेसचे (Hutatma Express) आरक्षित तिकीट काढले आहे, त्यांनी ते रद्द करून आपल्या तिकिटाचा पूर्ण परतावा घ्यावा, असं देखील रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) सांगण्यात आलं आहे. तर, भाळवणी ते भिगवणदरम्यान दुहेरीकरणाबरोबर विद्युतीकरणाचे कामही ब्लॉकदरम्यान केले जात आहे.

हुतात्मा एक्स्प्रेस (Hutatma Express) बंद असल्याने पुण्याकडे जाणाऱ्या सोलापूरच्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी वाहनांचे भाडे जास्तीचे असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नसल्याच्या प्रतिक्रिया सामान्य प्रवाशांनी बोलताना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे आणखी काही दिवस तरी हुतात्मा एक्स्प्रेसने प्रवास करण्यासाठी सोलापूरकरांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे. भाळवणी आणि भिगवणदरम्यान सुरू असलेल्या कामाची देखभाल आणि दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

दरम्यान, सोलापूरचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे (Pradeep Hirde) यांनी माहिती दिली आहे की, दुहेरीकरणाच्या कामासाठी इंजिनीअरिंग ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे हुतात्मा एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. दुहेरीकरणाचे आणि विद्युतीकरणाचे काम पूर्ण होताच गाडी सुरू करण्यात येईल. असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, भाळवणी ते भिगवण या 55 किलोमीटरच्या सेक्शनमध्ये रोज ब्लॉक घेऊन दुहेरीकरणाचे काम केले जाणार आहे.
यासाठी ब्लास्ट मशिनद्वारे नवीन खडी टाकली जाणार आहे. रुळाखाली खडीचा एक फुटाचा थर टाकला जाणार आहे.
तसेच स्लीपर टाकल्यानंतर रूळ टाकले जाणार आहेत. त्याचबरोबर विद्युतीकरणाचे खांब लावले जाणार आहेत.
त्यानंतर ओव्हरहेड वायर ओढली जाणार आहे. ही सर्व कामे 2 टप्प्यांत चालणार आहेत.
सिग्नल आणि पॉईंट एकमेकांस जोडले जाणार आहेत.
सर्व पॉईंट हे स्टेशन मास्तर यांच्याकडून ऑपरेट होतात की नाही याची पाहणी केली जाणार आहे.
त्यानंतर रेल्वेसेवा सुरू करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा

Tuljapur News | तुळजापूर यात्रा रद्द, मात्र दर्शनास ‘मुभा’ !

Bank Holidays In October | ऑक्टोबरमध्ये 21 दिवस बंद राहतील बँका, जाणून घ्या कोणत्या राज्यात केव्हा-केव्हा बंद आहेत बँका, येथे पहा पूर्ण List

Police Raid | खंडणी वसुलीसाठी पोलिसांची छापेमारी ! 3 तरुणांना बेदम मारहाण एकाचा मृत्यू; 6 पोलीस निलंबित

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Hutatma Express | … So Pune-Solapur Hutatma Express closed from 3rd to 17th October

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update