Hutatma Superfast Express | सोलापूर-पुणे-सोलापूर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस उद्यापासून आठवड्यातील 5 दिवस धावणार

पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – मध्य रेल्वेने सोलापूर विभागातील (Central Railway Solapur Division) प्रवाशांच्या मागणीनुसार आणि सुविधेसाठी गाडी सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने (railway administration) घेतला आहे. सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस (Solapur-Pune-Solapur Hutatma Superfast Special Express) 1 जुलैपासून आठवड्यातील पाच दिवस धावणार आहे. या गाडीचे सर्व कोचेस आरक्षित (Coach reserve) असणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. ही गाडी पुढील आदेश येईपर्यंत धावणार आहे.

Pune Municipal Corporation | अखेर ‘या’ 23 गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेश, राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

सोलापूर स्थानकातून 6.30 वाजता सुटेल

गाडी क्रमांक 01158 सोलापूर-पुणे-सोलापूर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस 1 जुलैपासून पुढील आदेश येईपर्यंत धावणार आहे. ही गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावरुन (Solapur railway station) आठवड्यातील पाच दिवस (सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार) सकाळी 6.30 वाजता सुटेल. ही गाडी पुढील स्थानक कुर्डुवाडी (Kurduwadi railway station) येथे सकाळी 7.17 आगमन होऊन 7.20 ला प्रस्थान करेल. दौंड स्थानकावर (Daund railway station) सकाळी 9.08 वाजता आगमन होईल आणि 9.10 वाजता प्रस्थान होईल. ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावर (Pune Railway Station) सकाळी 10.30 वाजता पोहचेल.

Manchar police station । अवसरी बुद्रुक येथील खासगी सावकाराविरुध्द गुन्हा दाखल

पुण्यातून संध्याकाळी 6.10 वाजता सुटणार

गाडी क्रमांत 01157 पुणे-सोलापूर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस 1 जुलै पासून पुढील आदेश येईपर्यंत पुणे रेल्वे स्थानकावरुन (Pune Railway Station) सुटेल. पुणे रेल्वे स्थानकावरुन (Pune Railway Station) आठवड्यातील पाच दिवस (सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार) रोज संध्याकाळी 6.10 वाजता सुटेल.

Hutatma Superfast Express | solapur pune solapur hutatma superfast special express will run tomorrow

या गाडी दौंड स्थानकावर (Daund railway station) 7.13 आगमन होईल आणि 7.15 वाजता प्रस्थान करेल. तर कुर्डुवाडी स्थानकावर (Kurduwadi railway station) रात्री 8.47 वाजता आगमन होईल आणि 8.50 वाजता प्रस्थान करेल. सोलापूर रेल्वे स्थानकावर (Solapur railway station) 10 वाजता ही गाडी पोहचेल.

Video | मंदिरा बेदीने दिला पती राज कौशल यांच्या पार्थिवाला खांदा, इमोशनल करणारी छायाचित्रे वायरल

गाडीला 16 कोच

सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस (Solapur-Pune-Solapur
Hutatma Superfast Special Express) गाडीला 16 कोच (16 coach) असणार आहेत.
यामध्ये 2 ब्रेकयान (2 Breakyan), 13 द्वितीय श्रेणी (13 Second class), 1 एसी चेअर कार
(1 AC chair car) असे 16 कोच असणार आहेत. या गाडीचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ
घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Hutatma Superfast Express | solapur pune solapur hutatma superfast special express will run tomorrow

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update