आता जगासमोर ‘Hybrid’ कोरोना व्हायरसची रिस्क, जाणून घ्या किती धोकादायक आहे हा?

लंडन : वृत्तसंस्था – एका नव्या स्टडीमध्ये खुलासा झाला आहे की, आता हायब्रिड कोरोना व्हायरस पसरत आहे. हा दोन नवीन कोरोना व्हायरसच्या व्हेरियंट्सने मिळून बनला आहे. हा माणसाकडून माणसाकडे पसरत आहे. जॉर्जियाच्या अ‍ॅटलांटामधील एमोरी युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ डेव्ह वॅनइन्सबर्ग यांनी हा खुलासा केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हा कोरोना व्हायरसचा इव्हेल्यूशनरी बदल आहे. चिंतेची बाब ही आहे की, शास्त्रज्ञांना हे माहित नाही की, हायब्रिड कोरोना व्हायरस कोणत्या माणासाचे किती नुकसान करू शकतो. यावर व्हॅक्सीन काम करेल किंवा नाही, हे सुद्धा माहित नाही.

Hybrid Coronavirus are Spreading

डेव्ह वॅनइन्सबर्ग यांनी म्हटले की, आम्हाला माहित नाही की, हायब्रिड कोरोना व्हायरस कसा पसरत आहे. परंतु दोन नव्या अभ्यासात याबाबत खुलासा झाला आहे. हायब्रिड कोरोना व्हायरसचा पहिला खुलासा सुमारे एक महिन्यापूर्वी झाला होता. तेव्हा युके आणि कॅलिफोर्नियाचे व्हेरियंट्स आपसात मिळून नवा हायब्रिड कोरोना व्हायरस बनले होते.

Hybrid Coronavirus are Spreading

युकेचा बी.1.1.7 आणि कॅलिफोर्नियाचा बी.1.429 व्हेरियंट एकमेकात मिसळून हायब्रिड कोरोना व्हायरस बनत आहेत. अमेरिकेच्या लॉस एंजलिसमध्ये हायब्रिड कोरोना व्हायरसची लाट सुरू आहे. यामध्ये काही असे म्यूटेशन झाले आहेत जे काही अँटीबॉडीजला सुद्धा निष्क्रिय करतात.

Hybrid Coronavirus are Spreading

युके आणि कॅलिफोर्नियाचे कोरोना व्हेरियंटस अतिशय संसर्गजन्य आहेत. यामुळे अनेक देशात पुन्हा कोरोनाची लाट आली आहे. अशावेळी याद्वारे बनणार्‍या हायब्रिड कोरोना व्हायरसचा परिणाम अतिशय भयंकर असेल. एक महिन्यापूर्वी हायब्रिड कोरोना व्हायरसचा शोध न्यू मेक्सिकोच्या लॉस एलमोस नॅशनल लॅबोरॅटरीचे शास्त्रज्ञ बेट्टी कोर्बर यांनी लावला होता.

Hybrid Coronavirus are Spreading

बेट्टी कोर्बर यांनी याबाबत 2 फेब्रुवारीला न्यूयॉर्क अ‍ॅकेडमी ऑफ सायन्सेसमध्ये याचे प्रेझेन्टेशन दिले होते. येथूनच त्यांनी संपूर्ण जगाला हायब्रिड कोरोना व्हायरसबाबत सांगितले होते. शास्त्रज्ञ या हायब्रिड कोरोना व्हायरसला रिकॉम्बिनेंट्स करत आहेत.

Hybrid Coronavirus are Spreading