Hybrid surgery | 4 महिन्याच्या बाळाच्या हृदयावर गुतांगुंतीची शस्त्रक्रिया झाली यशस्वी, पुण्यातील ‘या’ डॉक्टरांची कामगिरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune) डेक्कन येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील (Sahyadri Super Speciality Hospital) डॉक्टरांनी एका बाळाच्या हृदयावरील गुतांगुंतीची शस्त्रक्रिया (Hybrid surgery) यशस्वीरीत्या पार पाडली आहे. अतिशय गुंतागुंतीची असणारी शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. एका 4 महिन्याच्या लहान बाळावर पहिल्यांदाच ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्या लहान बाळाच्या हृदयातील छिद्र (VSD closure) बुजविण्यासाठी हायब्रीड शस्त्रक्रिया (Hybrid surgery) केली आहे.

‘या 4 महिने आणि 15 दिवसांच्या बाळाला आपल्या आयुष्याच्या दहाव्या दिवशी हृदयामध्ये 10 मिमी छिद्र असल्याचे निदान झाले. यामुळे त्या बाळाला खोकला आणि सर्दीचा त्रास होत होता. या लहान बाळाचे वजन जवळपास 4.2 किलो होते. या आजारामुळे त्या बाळाचे वजन वाढत नव्हते. अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटल्सचे हृदय शल्यविशारद डॉ. राजेश कौशिश (Dr. Rajesh Kaushish) आणि बाल हृदयरोग तज्ञ डॉ. पंकज सुगांवकर (Dr. Pankaj Sugavkar) यांनी सांगितली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

या दरम्यान, त्या लहान बाळाच्या हृदयातील हे छिद्र बुजविणे आवश्यक होते.
त्यासाठी आम्ही हायब्रीड तंत्राची (Hybrid mechanism) निवड केली.
त्यामधून हृदयापर्यंत पोहचण्यासाठी प्रभावी प्रक्रिया केली जाते.
पल्मनरी बायपासची (Pulmonary bypass) गरज पडत नाही आणि अन्य गुंतागुंतही टाळता येते.
असं हृदय शल्यविशारद डॉ. कौशिश (Dr. Rajesh Kaushish) यांनी सांगितलं आहे.
तर कौशिश यांनी स्टर्नोटॉमी (Sternotomy) ही प्रक्रिया केली.
म्हणून पुढच्या प्रक्रियेसाठी हृदयाच्या उजव्या कप्प्यापर्यंत पोहचता आले आहे.
यानंतर बाकी प्रोसेस ही गुंतागुंतीची होती. कारण त्यात हे छिद्र बुजविण्यासाठी 12 मिमी मस्क्युलर व्हीएसडी (Muscular VSD) उपकरण रोपित केले गेले.
तर डॉ. सुगांवकर (Dr. Pankaj Sugavkar) यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या टीम मार्फत या लहान बाळावर ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली गेली.

Web Title :- Hybrid surgery | successful surgery heart a four month old baby in pune’s Sahyadri Super Speciality Hospital

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही

‘या’ पद्धतीने आणि नाण्यांच्या बदल्यात मिळताहेत 1900 रुपयांपासून 1.5 लाख, तुमच्याकडे असतील तर ताबडतोब करा ‘हे’ काम

Earthquake | काही तासात देशात 5 ठिकाणी भुकंपाचे धक्के; बिकानेर, मेघालय तीव्र धक्क्याने हादरला