हैदराबाद बॉम्बस्फोट : दोन आरोपींना फाशी, एकाला जन्मठेप

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाईन

११ वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटांप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने दोन दोषी आरोपींना फाशी तर एका आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने अनिक शफीक सईद आणि इस्माइल चौधरी यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर तारिक अंजूम याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
[amazon_link asins=’B0756Z53JN,B072FJPFTC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c1c63a3f-b51e-11e8-9690-5de17de0df60′]

फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या अनिक याने लुंबिनी पार्कमध्ये बॉम्ब ठेवल्याचा आरोप होता. त्यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला होता. तर अकबर याने दिलसुखनगरमध्ये बॉम्ब ठेवला होता. मात्र त्याचा स्फोट झाला नव्हता. न्यायालयाने चार सप्टेंबर रोजी या आरोपींना दोषी ठरवले होते. तर तारिक अंजूम याला या आरोपींना आश्रय दिल्याच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवण्यात आले.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी