हैदराबाद ‘एन्काऊंटर’मुळं वातावरण ‘नरम-गरम’, ‘प्रश्नचिन्ह’ निर्माण केल्यानं होतेय चौकशीची ‘डिमांड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : हैदराबाद एन्काउंटरचे देशभरातील सर्वसामान्य जनतेकडून स्वागत होत आहे. परंतु असे असताना काही जेष्ठ व्यक्तींकडून आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून घडलेला प्रकार अयोग्य असल्याचे मत व्यक्त होऊ लागले आहे तसेच घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्यात यावी असे देखील मत व्यक्त करताना काही राजकीय आणि बुद्धजीवी लोकांनी स्पष्ट केले आहे.

आता या प्रकरणी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी देखील आपले मत स्पष्ट केले असून ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार देशात झालेल्या प्रत्येक एन्काउंटरची चौकशी व्हायला हवी. तसेच काँग्रेसचे नेते शशी थरूर, सीपीएमचे नेते सीताराम येचुरी यांनीही घडलेला प्रकार कायद्याला धरून नाही असे मत व्यक्त केले आहे.

न्यायिक व्यवस्थेबाहेरील हा एन्काउंटरचा प्रकार- शशी थरूर

शशी थरूर यांनी ट्विट केले की, न्यायिक व्यवस्थेबाहेरील झालेला हा एन्काउंटरचा प्रकार स्वीकारण्याजोगा नाही. या प्रकरणाची चौकशी करून अधिक माहिती मिळणे गरजेचे आहे असे देखील ते म्हणाले. जर आरोपींच्या हातात हत्यारे असतील तर पोलीसांनी केलेली कारवाई योग्य ठरू शकते. मात्र, जो पर्यंत संपूर्ण सत्य आपल्याला माहीत पडत नाही, तो पर्यंत याचा निषेध करणे योग्य ठरणार नाही. असे देखील मत त्यांनी मांडले.

‘कायदेशीर प्रक्रियाच योग्य होती’- रेखा शर्मा

रेखा शर्मा यांनी या प्रकरणावर प्रक्रिया देत स्पष्ट केले की, बलात्काऱ्यांना सजा मिळाली ही आनंदाची बाब असून ते होणे गरचेचेच होते परंतु ही प्रक्रिया न्यायिक पद्धतीनुसार व्हायला हवी होती. या आरोपींना शिक्षा योग्य पद्धतीने व्हायला हवी होती. तसेच सर्वांना वाटत होते की या बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, तसे झाले असते तर ते कायद्याला धरून झाले असते असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

आपण कायदा हातात घेऊ शकत नाही- मनेका गांधी

भाजपा खासदार मेनका गांधी म्हणाल्या, जे काही घडले ते अतिशय भयंकर आहे. आपल्याला वाटते म्हणून आपण असे कायद्याला डावलून लोकांना मारू शकत नाही. आपण कायदा आपल्या हातात घेऊ शकत नाही. त्यांना कायद्याने फाशीची शिक्षा द्यायला हवी होती.

गुन्हेगारी न्याय व्यवस्थेवरील विश्वास झाला कमी- केजरीवाल

झालेल्या एन्काऊंटरवर सगळीकडे आनंद व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी, फौजदारी न्याय प्रणालीवरील लोकांचा विश्वास कसा कमी झाला आहे आणि ही एक चिंतेची बाब आहे. असे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.

बदला कधीही न्याय होऊ शकणार नाही- सीताराम येचुरी

सीपीएमचे नेते सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे की, बदला हा कधीही न्याय होऊ शकणार नाही, असे सांगत २०१२ मध्ये दिल्लीत झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कारानंतर लागू करण्यात आलेल्या कडक कायद्याची आपण योग्य प्रकारे अंमलबजावणी का करू शकत नाही आहोत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like