हैदराबाद पोलिसांना राष्ट्रपती पदक द्यावं, शिवसेनेच्या ‘या’ खासदाराची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संशयित आरोपींना पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले. गुन्हा घडल्याच्या ठिकाणी चौकशीसाठी नेले असता या चारही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीमध्ये या चौघांना ठार करण्यात आल्याची माहिती तेलंगण पोलिसांनी दिली आहे. या घटनेविषयी अनेकांनी या एन्काउंटरप्रकरणी पोलिसांचे अभिनंदन केले असून काहींनी या एन्काउंटरबद्दल संशय व्यक्त केला आहे.

शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी हैदराबाद चकमकीचं समर्थन केलं असून पोलिसांचं अभिनंदन केलं आहे. तसेच त्यांनी पोलिसांना राष्ट्रपती पदक दिलं पाहिजे अशी मागणी केली आहे.

हैदराबाद एन्काउंटरप्रकरणी धैर्यशील माने म्हणाले की, ‘ पोलिसांच्या कारवाईला विरोध करणाऱ्यांच्या कुटुंबीयांसोबत जर ही घटना घडली असती तर ? पोलिसांच्या या कारवाईमुळे देशासमोर एक उदाहरण उभं राहील. या पोलिसांच्या कुटुबीयांना संरक्षण दिलं पाहिजे. चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली असून, त्यांच्या घरी असाच प्रकार झाला असता तर असं बोलले असते का ? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.’

Visit : Policenama.com

You might also like