का करावं लागलं पोलिसांना बलात्कार्‍यांचं एन्काऊंटर ?, वाचा सविस्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशातून हळहळ व्यक्त करणारी एक घटना हैद्राबादमध्ये काही दिवसांपूर्वी घडली होती. एका वेटणरी डॉक्टरवर चार नराधमांनी बलात्कार करून तिला जिवंत जाळले होते. आज सकाळी पहाटे तपास करत असताना चारही आरोपीना घटनास्थळी नेले असता त्यांनी पळून ज्याण्याचा प्रयत्न केला यासाठी आरोपींनी पोलिसांजवळची हत्यारे देखील हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर स्वरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात चारही आरोपी मारले गेले असे स्पष्टीकरण हैद्राबाद पोलिसांकडून देण्यात आले आहे.

या घटनेनंतर देशात अनेकांकडून या पोलिसांचे कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावर देखील या पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर कौतुकाचा वर्षाव झाल्याचे पहायला मिळत आहे. पोलिसांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल आज देशातील सर्वच स्तरांतून आनंद व्यक्त केला जातोय. कायद्याच्या चौकटीत राहून या आरोपीना शिक्षा द्यायला हवी होती असे मत देखील अनेकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे नेमके असे काय झाले ज्यामुळे पोलिसांना एन्काऊंटर करावा लागला असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

शमशाबाद परिसरात मोहम्मद आरीफ, नवीन, शिवा आणि चन्नकेशवुलू या चार आरोपींनी पीडित तरुणीला गाठलं होतं. आरोपींनी तिला जबरदस्तीने दारू पाजण्याचा प्रयत्न करत चौघांनी तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने प्रतीकार करण्यास सुरुवात केल्याने आरोपींनी गळा आवळून तिची हत्या केली आणि नंतर तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकलं. पोलिसांनी २९ नोव्हेंबरला या आरोपींना अटक केली होती.

काय झाले होते नेमके इन्काऊंटरच्यावेळी
आरोपींना त्याच ठिकाणी नेण्यात आलं , ज्या ठिकाणी या आरोपींनी पीडितेवर बलात्कार केला होता. त्यावेळी आरोपींनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याचादेखील त्यांनी प्रयत्न केला आणि पोलिसांवरच गोळ्या झाडल्या. या गोळीबारात २ पोलीस जखमी झाल्याचेही समजते आहे. त्यामुळेच पोलिसांना या आरोपींवर गोळीबार करावा लागला ज्यात चारही आरोपी ठार झाले. अशी अधिकृत माहिती शमसाबादचे पोलीस उपायुक्त प्रकाश रेड्डी यांनी दिली.

Visit : Policenama.com