हैदराबाद रेप केस : ‘एन्काऊंटर’ झालेल्या आरोपींचे ‘मृतदेह’ स्विकारण्यास नातेवाईकांचा स्पष्ट ‘नकार’

हैदराबाद : वृत्तसंस्था – हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संशयित आरोपींना पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले. आरोपींचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता तेलंगणा पोलिसच आरोपींचे अंत्यसंस्कार करणार आहेत. याबाबतची माहिती एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिली आहे.

हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संशयित आरोपींना पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले. गुन्हा घडल्याच्या ठिकाणी चौकशीसाठी नेले असता या चारही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीमध्ये या चौघांना ठार करण्यात आल्याची माहिती तेलंगण पोलिसांनी दिली आहे.

माझ्या मुलालाही जाळून मारा –
जर माझ्या मुलाने चूक केली असेल तर ज्याप्रमाणे त्याने त्या मुलीला जाळून मारलं तसचं त्यालाही मारलं पाहिजे. पीडित तरुणीही एका आईची मुलगी होती ना ?,” असे मत हैदराबाद येथे पशुवैद्यक महिलेवर सामुहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीच्या आईने घटना घडल्यानंतर व्यक्त केले होते.

हैदराबादमधील शासकीय रुग्णालयातील पशुवैद्यक तरुणीवर गेल्या आठवड्यात सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. बलात्कारानंतर तिची हत्या करुन चौघांनी तिचा मृतदेह पेटवून दिला होता. 28 नोव्हेंबरला सकाळी 26 वर्षीय पीडितेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर 29 तारखेला चारही आरोपींना अटक झाली होती. या घटनेविरोधात अख्ख्या देशभरात संतापाची लाट उसळली होती.

Visit : Policenama.com

Loading...
You might also like