हैदराबाद रेप केस : ‘न्याय’ झाला पण ‘अन्यायकारक’ पध्दतीनं, राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज पहाटे हैद्राबाद पोलिसांनी हैद्राबाद रेप आणि मर्डर केसमधील 4 आरोपींचा एन्काऊंटर केला. या घटनेनंतर देशभरातून अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रया येताना दिसत आहेत. काहींनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांचा समावेश आहे. खासदार मनेका गांधी यांनीही घडलेली घटना भयानक असल्याचं म्हटलं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनीही यावर आपली प्रतिक्रिया देत मत मांडलं आहे.

नवाब मलिक म्हणाले, “हैद्राबाद घटनेमध्ये कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून आरोपींना चौकात फाशी दिली असती तर लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असती. न्याय मिळाला तर आहे पण मार्ग मात्र आदरणीय बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीचा असायला हवा होता.” असं मलिक यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

दरम्यान याबाबत बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले होते, “हैद्राबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचं पोलिसांनी केलेलं एन्काऊंटर कायद्याला धरून नव्हतं. हे एन्काऊंटर अयोग्य होतं.” तर माध्यमांशी बोलताना मनेका गांधी म्हणाल्या होत्या की, “जे झालं ते देशासाठी अतिशय भयानक आहे. केवळ तुम्हाला असं करायचंय म्हणून तुम्ही लोकांचा जीव नाही घेऊ शकत नाहीत. तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाहीत. आरोपींनी न्यायालयाकडून फाशी मिळणारच होती.”

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like