हैदराबाद रेप केस : आरोपींच्या एन्काऊंटरबद्दल दिल्लीतील ‘निर्भया’च्या आईनं दिली ‘ही’ प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा शुक्रवारी सकाळी एन्काऊंटर करण्यात आला. या घटनेनंतर देशभरात संतापाचे वातावरण होते. या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. परंतू आज पोलिसांकडून या चौघांचे एन्काऊंटर करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या सिंघम स्टाईलच्या कारवाईचे जनमानसातून कौतूक करण्यात आले. पीडितेला न्याय मिळाल्याची भावना लोकांमधून व्यक्त करण्यात आली. पोलिसांकडून करण्यात आलेल्या या एन्काऊंटरनंतर दिल्लीत बलात्काराच्या घटनेत जीव गमावलेल्या ‘निर्भया’च्या आईने देखील पोलिसांना सलाम केला आणि तसेच आपल्या मुलीच्या मारेकऱ्यांना देखील तातडीने फाशी द्यावी अशी विनंती केली.

निर्भयाच्या आई आशा देवी यांनी एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांची पाठराखण करत आपल्या मनातील वेदना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, गेली सात वर्षं माझ्या मुलीला न्याय मिळावा म्हणून मी संघर्ष करत आहे. न्यायालयात खेटे मारत आहे. न्यायालय आरोपींच्या मानवाधिकाराचा मुद्दा पुढे करत आहेत. त्यामुळेच हैदराबादमध्ये जे झाले त्याने मी खूप खूश आहे. पोलिसांनी खूप चांगले काम केले, त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होता कामा नये. उलट त्यांनी एक उदाहरण दिले आहे. अशा कारवायांची आज गरज आहे.

त्या म्हणाल्या की जसा गुन्हा कराल, तशीच शिक्षा मिळेल, हे प्रत्येकाने समजले पाहिजे. हैदराबादमधील घटनेतून सरकारने, दिल्ली पोलिसांनी आणि न्यायालयानेही योग्य धडा घेण्याची गरज आहे.

हैदराबाद दिशा प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटरनंतर पीडितेच्या बहिणेने सांगितले की हा एन्काऊंटर देशासमोर ठेवण्यात आलेले एक उदाहरण आहे. तर पीडितेचे वडील म्हणाले की माझ्या मुलीच्या आत्म्याला आता शांती मिळेल.

एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांनी ही कारवाई करत चुकीचा पायंडा पाडला असे मत काहींनी व्यक्त केले. शिवसेनेच्या नेत्या डॉ. निलम गोऱ्हे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून एन्काऊंटरची चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे. हे एन्काऊंटर अयोग्य असल्याची प्रतिक्रिया विशेष वकील उज्वल निकम यांनी दिली. झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणे स्वाभाविक आहे, असा न्याय चंबळचे दरोडेखोर देखील करायचे, पण ते शेवटी दरोडेखोरच होते असे मत देखील उज्वल यांनी निकम मांडले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like