हैदराबाद एन्काऊंटर : ‘मलाही तिथंचं घेऊन जा अन् गोळ्या घाला’, 20 वर्षीय आरोपीच्या पत्नीचं पोलिसांना साकडं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या हैद्राबाद बलात्कार घटनेचा काल शेवट झाला. तपासासाठी नेण्यात आलेल्या आरोपींची पळून जाण्यासाठी पोलिसांवर गोळीबार केला आणि पोलिसांच्या प्रती हल्ल्यात चारही आरोपी ठार झाले होते. यानंतर संपूर्ण देशात याबाबत आनंद व्यक्त केला जात होता. सोशल मीडियावर तर या पोलिसांवर कौतुकाचा पाऊस पाडण्यात आला आहे.

हैदराबाद पोलिसांच्या धाडसी कारवाईनंतर बलात्कारपीडित महिलेच्या कुटुंबीयांनी आम्हाला न्याय मिळाला, अशी भावना व्यक्त केली होती. मात्र, आरोपींच्या कुटुंबीयांनी आमच्यावर अन्याय झाल्याचे म्हंटले आहे. मोहम्मद आरिफच्या आईला बोलताच येत नव्हते. आपल्या मुलाने हा गुन्हा केला असेल तर त्याला सर्वात कडक शिक्षा देण्यात यावी, असे त्याच्या वडिलांनी आधीच म्हंटले होते.

हैदराबाद बलात्कार प्रकरणात पोलिसांनी मोहम्मद आरिफ, जोलू शिवा , जोलू नवीन, चिंताकुन्टा चेन्नाकेसवलू या चार आरोपींना अटक केले होते. त्यानंतर, न्यायालयाने या चौघांना पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, पोलीस कोठडीत असतानाच हैदराबाद पोलिसांनी एनकाऊंटर करुन चारही आरोपींना ठार केले.

त्यातील आरोपी चेन्नाकेशवुलूची पत्नी तर खूप रडत होती. ती म्हणाली की, मी आता एकटी राहिले आहे. तिचे आणि चेन्नाकेशवुलुशी अलीकडेच लग्न झाले होते. त्याला मुत्रपिंडाचा आजार होता. माझ्या नवऱ्याला काही होणार नाही आणि तो लवकर परत येईल, असे मला सांगण्यात आले होते. पण आता मला काहीच सुचत नाही.

सिवा नावाच्या आरोपीची आई जोल्लू रामप्पा म्हणाल्या की, माझ्या मुलाने तो गुन्हा केला असेल पण त्यासाठी त्याला दिलेली शिक्षा खूप भयंकर आहे. हे चारही संशयीत अतिशय गरीब कुटुंबातील होते. पण त्यांनी नंतर कष्टाने बऱ्यापैकी पैसा मिळवला. मात्र, दारु आणि इतर व्यसनांनी त्या चौघांचा नाश केला.

डॉक्टर असलेल्या तरुणीवर 28 नोव्हेंबर रोजी नराधमांनी बलात्कार केला होता. कोणालाही समजू नहे म्हणून त्यांच्याकडून पीडितेचा मृतदेह देखील जाळण्यात आला होता. या घटनेनंतर संपूर्ण देशभर संतापाची मोठी लाट निर्माण झाली होती. अनेकांकडून यातील दोषींना लवकरात लवकर शिक्षा द्या अशी मागणी देखील केली जात होती.

Visit : Policenama.com