हैदराबाद रेप केस : मुख्य आरोपीचा मोठा खुलासा, ज्यावेळी डॉक्टरला जाळलं त्यावेळी ‘ती’ जिवंत होती

हैदराबाद : वृत्तसंस्था – हैदराबाद डॉक्टरवर झालेल्या गँगरेप आणि खूनामुळे देश हादरून गेला आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटले असून संसदेत ही यावर चर्चा झाली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडीत आरोपींकडे केलेल्या चौकशीत मुख्य आरोपीने मोठा खुलासा केला आहे. तसेच या प्रकरणातील महत्वाचे खुलासे आरोपीने केले आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, चार आरोपींनी पीडित महिला मृत झाल्याचे समजून जाळत होते त्यावेळी ती जिवंत होती.

स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्य आरोपी मोहम्मद पाशा ने सांगितले की, गँगरेप नंतर महिला पळून जाऊ नये यासाठी तिचे हात-पाय बांधण्यात आले होते. पाशाच्या म्हणण्यानुसार चार आरोपींनी महिलेवर बलात्कार केल्यानंतर तिला जबरदस्तीने दारू पाजली. ती बेशुद्ध झाल्यानंतर तिला एका लॉरीमध्ये टाकून पुलाखाली नेण्यात आले. त्यानंतर तिच्यावर पेट्रोल टाकून जाळण्यात आले.

आरोपींनी सांगितले की, ज्यावेळी महिला मृत झाली असे वाटले त्यावेळी त्यांनी तिला पेट्रोल टाकून जाळले. मात्र तिला आग लावण्यात आली त्यावेळी ती ओरडली. मुख्य आरोपीने हेही सांगितले की, ज्यावेळी महिला जळत होती त्यावेळी बराचवेळ तिला जळताना पहात होतो. पोलिसांकडून पकडले जाऊ या भीतीने तिला मारुन टाकल्याचे पाशाने पोलिसांना सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like