पिस्तूल हिसकावलं…फायरिंग केली… पोलिसांनी सांगितली हैदराबाद एन्काऊंटरची पूर्ण ‘स्टोरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैद्राबाद एन्काऊंटरबाबत पोलिसांनी अनेक खुलासे केले आहेत. सायबराबादचे पोलीस कमिशनर व्ही. सज्जनार यांनी सांगितले की, 27 – 28 नोव्हेंबरच्या रात्री दिशाचा गँगरेप करण्यात आला आणि त्यानंतर हत्या करण्यात आली व मृतदेह जाळण्यात आला. सायंटिफिक पुरावे गोळा करून पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली होती. त्यानंतर चारही आरोपींना रिमांडमध्ये घेण्यात आले होते.

व्ही. सज्जनार यांनी सांगितले की, 10 पोलिस आज आरोपींना घेऊन नेमका गुन्हा कसा घडला याची पडताळणी करण्यासाठी घटनास्थळी घेऊन गेले होते. या दरम्यान दोन आरोपींनी पोलिसांकडून दोन हत्यारे हिसकावून घेतली. यानंतर पोलिसांनी त्यांना चेतावणी दिली. परंतु त्यांनी पोलीस टिमवरच फायरिंग केली. त्यासोबत दगडांनी देखील हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत चारही आरोपी मारले गेले.

आरोपींना का आणण्यात आले होते घटनास्थळी
व्ही. सज्जनार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 4 आणि 5 डिसेंबर रोजी आम्ही चारही आरोपींची चौकशी केली होती. यावेळी आरोपींची मोबाईल, पॉवर बँक आणि घड्याळाबद्दल सांगितले होते. या सर्व गोष्टी शोधून ताब्यात घेण्यासाठी आणि झालेली घटना रिक्रिएट करण्यासाठी आरोपींना घटनास्थळी नेण्यात आल्याचे सांगितले.

15 मिनिटांची चकमक
पोलिसांनी सांगितले की चारही आरोपींना बेड्या घातलेल्या नव्हत्या. यामुळे आरोपींची पोलिसांकडून पिस्तूल ओढून घेतले, त्यानंतर ते पळू लागले. त्यानंतर पोलिसांनी त्याना चेतावणी दिली परंतु आरोपींनी उलट फायरिंग सुरु केली. त्यानंतर मात्र पोलिसांनी फायरिंग केली. सकाळी 5.45 ते 6 वाजेपर्यंत म्हणजेच 15 मिनट ही चकमक चालली.

दोन पोलीस कर्मचारी जखमी
एन्काऊंटदरम्यान दोन पोलिसही जखमी झाल्याचा आयुक्तांचा दावा आहे. यात एक उपनिरीक्षक आणि एक हवालदार समाविष्ट आहे. महबूबनगर रुग्णालयात आरोपीचे शवविच्छेदन केले जात आहे. आम्ही डीएनए प्रोफाइल घेतले. आम्हाला वाटते की, या चौघांनी कर्नाटक आणि तेलंगणामध्ये अनेक गुन्हेगारी घटना घडवून आणल्या आहेत.

मानवाधिकार आयोगाला उत्तर देईल
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या नोटिसवर पोलिस आयुक्त व्ही. सज्जनर म्हणाले की आम्ही सर्व एजन्सींना उत्तर देण्यासाठी तयार आहोत.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like