हैदराबाद रेप केस : पुलाखाली आरोपींचा ‘एन्काऊंटर’, वरून जमावाकडून पोलिसांवर फुलांचा ‘वर्षाव’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हैद्राबाद गँग रेप आणि मर्डर केसमधील आरोपींना पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार करण्यात आलं. आरोपींचा एन्काऊंटर नॅशनल हायवे 44 जवळ गुरूवारी रात्री उशीरा झाला. या एन्काऊंटर नंतर सर्वच स्तरातून पोलिसांचं कौतुक होत आहे. हैद्राबादमधील लोक मोठ्या संख्येत घटनास्थळी गेले आहेत आणि जे पोलिसांवर फुलांचा वर्षाव करत आहेत.
पुल के नीचे एनकाउंटर, ऊपर से भीड़ ने बरसाए हैदराबाद पुलिस पर फूल
जेव्हा लोकांना आरोपींच्या एन्काऊंटरची माहिती मिळाली तेव्हा लोक घटनास्थळी गर्दी करू लागले. काही लोकांनी अक्षरश: पोलिसांना खांद्यावर उचलून घेतलं आणि घोषणाही दिल्या. जागोजागी लोक ब्रिजवर उभं राहून पोलिसांवर फुलांचा वर्षाव करत आहेत. हैद्राबाद पोलीस जिंदाबाद अशा घोषणाही लोकांनी दिल्या.

एन्काऊंटर झालेल्या स्थळावर लोकांची हजारोंच्या संख्येत गर्दी जमा झाली आहे. पोलिस यंत्रणा लोकांवर नियंत्रण ठेवत त्यांना आवरत आहेत. इथेही काही लोक घोषणा देत आहेत फुले उधळत आहेत. यात अनेक युवा महिलांचा समावेश आहे. घटनास्थळी आलेले लोक एसीपी जिंदाबाद, डीसीपी जिंदाबाद अशा घोषणा देत आहेत. सोशलवर मीडियावरही पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. अनेक तरुण-तरुणी हैद्राबाद पोलीस आणि सायबराबाद पोलीस कमीश्ननर व्ही सी सज्जनार यांचं कौतुक करत आहेत.

 

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like