हैदराबाद रेप केस : 100 नंबरवर ‘कॉल’ केला तेव्हा पोलिसांनी ‘आधार’ नंबर मागितला, पीडितेच्या ‘कुटूंबानं’ सांगितलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येची घटना घडली. या घटनेने संपूर्ण देशाला धक्का बसला. आता लोक या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. संसदेत देखील तात्काळ शिक्षा देण्यात यावी यासाठी मागणी करण्यात आली. त्यानंतर या महिलेच्या आई वडील बहीणीने या घटनेवर भाष्य केले.
पीडिताचा मृतेदह मिळाल्यावर जेव्हा पीडितेची बहीण पोलिसांकडे पोहचली तेव्हा पोलिसांनी सांगितले की जर तुमच्या बहिणीने 100 नंबरवर फोन केला असता तर ती कदाचित वाचली असती. पीडितेच्या बहिणीने सांगितले की नातेवाईकांद्वारे शोध घेऊन जेव्हा अखेर 100 नंबरवर फोन केला तेव्हा पोलीस कर्मचाऱ्याकडून पहिल्यांदा आधार नंबर मागण्यात आला आणि त्यानंतर त्यांची तक्रार दाखल करुन घेतली.
पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितले की जेव्हा ते तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसात पोहचले तेव्हा पोलीस असे ही म्हणाले की तुमची मुलगी कोणाबरोबर तरी फिरायला गेली असेल. पीडितांच्या वडीलांनी सांगितले की त्यांनी पोलिसांना मुलीची कॉल रेकॉर्डींग ऐकवली. परंतू ते हे खरं मानण्यास तयारच नव्हते. बऱ्याच वेळानंतर पोलिसांकडून तक्रार दाखल करुन घेण्यात आली.
पीडितेचे नाव जाहीर केल्यास नोटीस –
काही चॅनलवर आणि सोशल मिडिया साइटवर या घटनेनंतर हत्येचे फोटो टाकण्यात आले त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे आणि याला रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या चॅनल आणि साइटवर आरोपींचे फोटो देखील प्रकाशित करण्यात आले.
या प्रकरणी तपास करणाऱ्या साइबराबाद पोलिसांनी हे देखील सांगितले की काही प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने न्यूज चॅनेल, वृत्तपत्र आणि सोशल मिडियावर तपासासंबंधित कागदपत्र प्रकाशित करण्यात आली ज्यामुळे तपासात अडचणी आल्या. याकारणाने त्यांना भारतील दंड संहितेद्वारे कलम 149 च्या अंतर्गंत नोटीस जारी करण्यात आली आणि अशा प्रकारचे प्रकाशन, प्रसारण रोखण्यास सांगितले आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की काही न्यूज चॅनेल आणि सोशल मिडियावर तपासासंबंधित कागदपत्र प्रकाशित करण्यात आली त्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. तसेच सोशल मिडिया कंपन्यांबरोबर देखील बोलणे सुरु आहे की त्यांनी अशा फोटोंना त्यांच्या मंचावरुन हटवावे.
हैदराबादच्या एका सरकारी रुग्णालयात सहायक पशु चिकित्सक म्हणून काम करणाऱ्या महिलेचे जळालेला मृतदेह 28 नोव्हेंबरच्या सकाळी शादनगरमध्ये एका भोगद्याजवळून ताब्यात घेण्यात आला. घटनेच्या पहिल्या रात्री ही महिला गायब झाली होती. या प्रकरणी 29 नोव्हेंबरला 4 आरोपींनी ताब्यात घेतले.
त्यानंतर साइबराबाद पोलिसांनी मिडियाला आवाहन केले की त्यांनी या घटनेचे प्रसारण सतत करु नये आणि पीडितेचे नाव सांगू नये. त्यांनी सोशल मीडियावर जस्टिस फॉर दिशा हॅशटॅग देखील सुचवला आहे.
Visit : policenama.com
- ‘या’ खास चहाचे हे ६ आरोग्यदायी फायदे, असा तयार करा, जाणून घ्या
- नेहमी हसा, च्युइंगम खा…आणि कमी करा वजन ! ‘वेटलॉस’च्या ‘या’ खास ५ ट्रीक
- कर्करोगावर गुणकारी आहे ‘कडुनिंब’, जाणून घ्या ५ आरोग्यदायी फायदे
- मुलांच्या ‘या’ ५ गोष्टी मुलींना नाहीत पसंत, फिटनेसकडे वेळीच द्या लक्ष
- लिंबाचे ‘हे’ ७ फायदे जाणून घेतले तर तुम्ही रहाल निरोगी !
- मुल नको असल्यास आता पुरूषांसाठीही गर्भनिरोधक गोळी ! ‘ही’ आहेत ३ वैशिष्ट्ये
- प्रेयसीचे ओठ थरथरले, लवलवले तर ‘ही’ सुद्धा असू शकतात ६ कारणे