हैदराबाद रेप केस ! ‘एन्काऊंटर’ होण्यापुर्वीच आरोपींनी दिला होता ‘कबूल’नामा, सांगितलं होतं ‘त्या’ रात्रीचं धक्कादायक ‘वास्तव’

पोलीसनामा ऑनलाईन : हैद्राबादमधील दिशा सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चारही आरोपी ६ डिसेंबर रोजी एन्काउंटरमध्ये ठार झाले. दरम्यान, पोलीस कोठडीत असताना या आरोपींनी घटनेशी संबंधित आपण केलेल्या सर्व कृत्याची कबुली दिली आहे. सोबतच आरोपींनी चौकशी दरम्यान कबूल केले की, यापूर्वीही त्यांनी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात अशा प्रकारच्या ३ ते ४ घटना केल्या होत्या, ज्याचा तपास सध्या सुरु आहे.

आरोपींनी सांगितले की, २६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ते ट्रकसह शमशाबाद टोलवर पोहोचले होते, पण ट्रक बुक झालेला नव्हता. गाडीमालक श्रीनिवासन रेड्डी यांनी तिथेच थांबण्यास सांगितले. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून सर्व आरोपींनी दारू पिण्यास सुरुवात केली होती. त्या रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास दिशाने स्कूटीला टोल प्लाझाजवळ आरोपीच्या ट्रकच्या मागे उभी केली. दिशाच्या चेहऱ्यावर कपडा बांधलेला होता. तिने चेहऱ्यावरील कापड काढताच त्यातील एक आरोपीचे तिच्याकडे लक्ष गेले. त्याने लगेच दुसऱ्या साथीदाराला खुणावले. त्याच वेळी आरोपींनी हा कट रचला.

यानंतर, नियोजन करून, आरोपींनी दिशाच्या स्कूटीची हवा काढली. रात्री साडेनऊच्या सुमारास दिशा शमशाबाद टोल प्लाझावर पोहोचली असता, दिशाला स्कूटी पंक्चर असल्याचे जाणवले. ती घाबरून गेली. त्यानंतर योजनेनुसार आरोपी तिच्याकडे गेला आणि पंक्चर काढण्यासाठी मदत करण्यास सांगितले.

दरम्यान, दिशाने तिच्या बहिणीशीही फोन करून भीती बोलून दाखविली. १० मिनिटांनंतर एक आरोपी स्कुटीमध्ये हवा भरून घेऊन आला. दिशा पैसे देऊ लागली, त्यावेळी आरोपीने मदतीचे नाटक करत पैसे घेण्यास नकार दिला. त्यानंतर, आरोपीने दिशाच्या चेहऱ्यावर कपडा टाकून तिचे तोंड दाबले. आणि नंतर चारही आरोपी तिला टोल प्लाझाजवळ रिकाम्या प्लॉटवर घेऊन गेले. तेथे आरोपींनी तिला जबरदस्तीने तिला दारू पाजली. यानंतर, दिशा बेशुद्ध झाली. त्यानंतर या चारही आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

त्यानंतर साडेबारा ते अकराच्या सुमारास चार आरोपींनी बेशुद्ध अवस्थेत दिशाला चादरीत गुंडाळले आणि ट्रकमध्ये ठेवले. त्यातील एका आरोपीने दिशांची स्कुटी घेत ट्रकचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्यावेळी दिशा जिवंत होती. नराधमांनी गाडीतही तिच्यावर बलात्कार केला.

त्यानंतर एक आरोपीने एनएच ४४ वरून पेट्रोल खरेदी केले आणि पुलाजवळ पोहोचला, तसेच ट्रकमधून डिझेल बाहेर काढले. त्यावेळी दिशेने आरडाओरड करण्यास सुरुवात केल्याने आरोपींनी तिचा गळा आवळून हत्या केली. नंतर तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळून टाकले. त्यानंतर जवळपास १५ मिनिटे हे चौघेही मृतदेहाजवळ उभेच होते.

दरम्यान, २७ नोव्हेंबर रोजी महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि जिवंत जाळल्याचं घटनेनंतर संपूर्ण देश हादरला होता. पोलिसांनी तपास करत ४ आरोपींना ताब्यात घेतले होते. १० दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्यांना ६ डिसेंबर रोजी एन्काउंटरमध्ये ठार करण्यात आले.

Visit : Policenama.com